मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले आणि एकनाथ शिंदेंकडे आले, ठाकरेंना गेल्या चार वर्षात दुसरा मोठा धक्का शिंदेंनी दिला आहे. टायगरच्या नावानं झालेलं हे ऑपरेशन देशभरात गाजलं. मात्र, यादरम्यान महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. सूत्रांची माहिती अशी आहे की, शिंदेंकडे पाच खासदार सहज गेले, मात्र सहावा खासदार जायला तयार नव्हता. अनेक प्रयत्न झाले पण या सहाव्या खासदाराची मनधरणी होत नव्हती. अखेर यामध्ये उडी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी. फडणवीसांनी त्या सहाव्या खासदाराला शब्द दिला, जबाबदारीचं वचन दिलं आणि ठाकरेंचा गट अखेर फुटला.
ADVERTISEMENT
‘ऑपरेशन टायगर’ची इनसाइड स्टोरी
‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्र्यांची शिष्टाई कशी कामाला आली याचीच ही स्टोरी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा... तर सूत्रांच्या माहितीनुसार ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा तसं तर 2024 पासूनच सुरु आहे. याबाबत शिंदेंच्या नेत्यांकडून वारंवार हिंटही दिली जात होती. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासूनच खासदारांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. पण, माहिती अशी आहे की, जानेवारी, 2026 मध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं हा मुद्दा सिरीयसली घेतला. ता गट फोडायचा म्हणल्यावर सहा खासदार फोडणं गरजेचं होतं.
हे ही वाचा>> केतन अग्रवाल हत्या प्रकरण, सियाचा प्रियकर चेतन चौधरी नेमका कोण आहे?
हे खासदार फोडण्याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सातत्यानं दिल्ली वाऱ्या केल्या. किमान पाच वेळा तरी भाजप श्रेष्ठींची भेट घेतली होती परंतु, खासदारांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की शिवसेनेत यावर निर्णय होत नव्हता, अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता सांगितलं असं जातंय की या सहापैकी बहुतांश खासदारांची इच्छा कमळ हाती घेण्याची होती. मात्र, खासदारांना शिवसेनेतच प्रवेश दिला गेला पाहिजे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
शिवसेनेत प्रवेश द्यायचा की भाजपमध्ये यावर काथ्याकूट झाल्यानंतर एप्रिलमध्ये ‘ऑपरेशन टायगर’करिता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदेंना ग्रीन सिग्नल दिला, अशी सूत्रांची माहितीय. शिंदेंनी आपल्या स्टाईलमध्ये पाच खासदारांना मनवलं पण सहावा गडी काय तयार होत नव्हता. मग भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून फडणवीसांना विचारणा झाली आणि याची जबाबदारीच त्यांना दिली गेली.
हे ही वाचा>> Exclusive Video: पुण्यातील कॅफेमध्ये बॉयफ्रेंड चेतनला बोलावलं, कॉफी पित थंड डोक्याने सियाने ठरवला गेम अन्..
मग मुख्यमंत्र्यांनी यावर उतारा शोधला. सहाव्या खासदाराला त्यांनी संपर्क केला. संपर्क साधून या खासदाराचं मन सुद्धा त्यांनी वळवलं. विशेष म्हणजे खुद्द फडणवीसांनी या खासदाराच्या राजकीय कारकिर्दीची जबाबदारी घेण्याचा शब्द दिला आणि हा तिढा सुटला, असं सूत्रं सांगतात. हे कधी घडलं तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात. सूत्रं वेगाने हलली आणि ‘ऑपरेशन टायगर’ पूर्ण झालं.
आता आपण जर लक्षात घेतलं तर ठाकरेंचे हे खासदार फोडफोडीचे राजकारण रंगात आलं असताना मुख्यमंत्री फडणवीस कुठेच पिच्चरमध्ये नव्हते. त्यांनी पूर्णपणे मौन बाळगलेलं. मात्र मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सूचक विधान केलं होतं. ऑपरेशन यशस्वी झाले आहे आणि रुग्ण एकदम सुदृढ आहे, त्यामुळे कोणीही काळजी करण्याची गरज नाही, असे म्हणत मुख्यमंत्री पहिल्यांदाच यावर बोललेले.
एकूणच काय तर एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर एका खासदारामुळं फसलंच होतं. या खासदारानं शिंदेंचं टेन्शन वाढवलेलं. बंडाचा झेंडा हाती घेतलाच आहे, तर आता भाजपमध्येच प्रवेश द्या असा या सहाव्या खासदाराचा आग्रह होता अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र देवेंद्र फडणवीस धावून आले आणि त्यांनी शिंदेंचा ताण कमी केला अशी माहितीही कळतेय.
ADVERTISEMENT











