मुंबई: शिवसेना (शिंदे गट) पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) हे पत्रकारांशी केलेल्या अत्यंत शिवराळ, घाणेरड्या आणि मग्रूर वर्तनामुळे चर्चेत आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून निवडून आल्यानंतर अलीकडेच शिंदे गटात प्रवेश केलेल्या संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे पत्रकार संघटनांसह राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (25 जून) काही पत्रकार संजय दिना पाटील यांना सध्याच्या सुरू असलेल्या राजकारणाबाबत प्रश्न विचारण्यासाठी गेले असता त्यांनी संतप्त होत पत्रकारांनाच शिविगाळ केली. "तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारून पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा. तुम्ही उगाच माझ्या मागे लागलात. परत आलात तर मारून पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला जे करायचं ते करा," अशी अत्यंत मग्रूर भाषा त्यांनी वापरली.
या कथित वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीकडून पत्रकारांशी अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसंच एवढी मग्रुरी येते कुठून असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
ही पाहा संजय पाटलांची मग्रुरी
'बोललोय.. समोर जे आहे ते जाणार ना.. जे करणार, बघा.. जे करणार ते भोगणार. अरे भाई कशाला.. बस झालं ना.. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतो.. बोलणारच नव्हतो.. बोललो ना भाई आता, कशाला आता करतोय.. चल बस माझ्या बरोबर.. बस ना गाडीत.. जेवढं बोलायचं तेवढं बोलू चला.. कशाला? इज्जत देतो भाई घे ना यार.. कशाला'
हे ही वाचा>> VIDEO: 'आईच्या गां%$ गेलं, गां%# बोट घालतात..', शिंदे गटात गेलेल्या संजय पाटलांची घाणेरडी भाषा, कॅमेऱ्यात सगळं कैद
'जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय तुम्ही.. ये भाई बंद कर ना.. बंद कर नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे आणि तुम्ही काय आहात. पहिलं पण सांगितलंय मी.. मामा बाजू हो..'
'इज्जत करतोय, इज्जत करा.. सांगतोय परत.. तुम्ही उगाच माझा गां%# बोट घालतात.. रेकॉर्ड कर, इज्जत करतोय उगाच डोक्यात जाऊ नका.. उगाच डोक्यात जाऊ नका.. घराखाली उभा ठेवतोय तुम्हाला, जेवायलो देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना.. मी बोलणारा नाहीए.'
'आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण.. जे लिहायचं ते लिहा.. लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा.. तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय, सहन करतोय तुम्हाला.. खूप दिवस सहन केलं तुम्हाला. मग अजून कशाला गां%$ घुसताय?'
हे ही वाचा>> 'परत आला तर मारुन पाठवणार...' खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना थेट धमकी
'अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची.. बोललीय ना ती, सांगितलंय ना सर्व.. त्यांनी काही बोलू दे.. अरे काही बोलू दे, आईच्या गां%$ गेलं.. आणि येऊ नका माझ्याकडे काही घ्यायला. आलं तर मारणार आता.. रेकॉर्ड करा आणि सांगा.. तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर.. काय करायची ते कंप्लेंट कर.. पोलीस आहेत त्यांच्या समोर सांगतोय. बस्स झालं सहन केलं खूप.. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे..'
'घरापर्यंत आले तुम्ही माझ्या. एक कॅमेरावाला घरात आला माझ्या. घरात माझे बायका-मुलं झोपले होते, माझी सूनबाई झोपलेली आहे तरी घरात गेले, घरात रेकॉर्डिंग केली.. काही लिमिट आहे ना..' अशा मुजोर आणि मग्रूर भाषा करत संजय दिना पाटलांनी पत्रकारांना पोलिसांसमोरच धमकावलं.
ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटले आणि शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या संजय पाटलांचा नवा वाद
विशेष म्हणजे, संजय दिना पाटील हे नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षातून बाहेर पडून Shiv Sena मध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या या राजकीय निर्णयामुळे आधीच चर्चा सुरू असताना आता पत्रकारांशी झालेल्या वादामुळे त्यांच्याभोवती नवीन वाद निर्माण झाला आहे.
पत्रकार संघटनांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली असून पत्रकारांना धमकावणे हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाव आणण्याचा प्रकार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. काही पत्रकार संघटनांनी या घटनेबाबत अधिकृत भूमिका घेण्याचे संकेतही दिले आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर संजय दिना पाटील यांच्याकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नसून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शिंदे गटातील वरिष्ठ नेते या वादावर काय प्रतिक्रिया देतात, याचीही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद हा लोकशाही व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे या घटनेनंतर राजकीय नेत्यांच्या सार्वजनिक वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील काही दिवस हे प्रकरण अधिक चर्चेत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT











