Air pollution can make you impotent: मुंबई : प्रदूषणामुळे होणाऱ्या धोक्यांबद्दल अगदी शालेय अभ्यासक्रमापासून बोललं जातं. हवा, पाणी, ध्वनी प्रदूषणामुळे होणारे धोके प्रत्येकालाच माहिती आहे. मात्र तरीही या समस्येकडे जेवढं गांभीर्याने पाहायला हवं, तेवढं पाहिलं जात नाही. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई, दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणाचा टोकाला पोहोचल्याचं पाहायला मिळतं. दूषित घटक हवेत मिसळले की हवेची गुणवत्ता बिघडते आणि प्रदूषणाचा प्रादुर्भाव दिसून येतो. (Air Pollution can harm fertility and reproduction system of human being)
ADVERTISEMENT
हवेचं प्रदूषण हे मानवी फुफ्फुस आणि हृदयासाठी सर्वात धोकादायक मानलं जातं. पण तेवढंच धोकादायक के शरिराच्या इतर अवयवांसाठी सुद्धा आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण प्रदुषित हवा स्त्री आणि पुरुष दोघांच्याही प्रजननाची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी करू शकतं, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. प्रदीर्घ काळ प्रदूषित हवेत राहिल्यास जोडप्यांना थेट वंध्यत्वाला सामोरं जावं लागू शकतं.
हे ही वाचा >>Viral: संध्याकाळ होताच नागीण उगवते सूड! 5 जणांना डसली अन् गावात...
अनेकांची चिंता वाढवणारा रिपोर्ट
वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या गंभीर गोष्टींवर न्यूज मेडिकलच्या अहवालात खुलासा करण्यात आला आहे. वायू प्रदूषणामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो. जेव्हा पुरुष प्रदूषित हवेच्या संपर्कात येतात आणि दूषित घटक जेव्हा शरिरात प्रवेश करतात, तेव्हा शरिरातील शुक्राणूंची गुणवत्ता आणि शुक्राणूंची संख्या दोन्हींमध्येही घट होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, प्रदूषित हवेतील घटक शरीरात जळजळ आणि इतर आरोग्याच्या समस्या निर्माण करतात. याचाच परिणाम होऊन शुक्राणूंच्या निर्मिती प्रक्रियेत अडचण येते आणि उत्पादन कमी होऊ शकतं. यामुळे नपुंसकत्व किंवा वंध्यत्वाचा धोका वाढतो. वंध्यत्वामुळे जोडप्यांची पालक होण्याची शक्यता कमी होते.
प्रदूषित हवेचा परिणाम हा केवळ पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरच परिणाम नाही तर महिलांवरही होऊ शकतो. त्यामुळे महिलाही वंध्यत्वाच्या बळी ठरू शकतात. वेगवेळ्या संशोधनांमधून असं समोर आलंय की, प्रदूषित हवेमुळे महिलांच्या प्रजन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास त्यांना कायमचं वंध्यत्वही येऊ शकतं.
हे ही वाचा >>Love Relationship: 'माझं तुझ्यावर लय प्रेमंय...', असं प्रपोज मुलंच करतात, मुलीचं काय अडतं?
द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, 2021 मध्ये चीनमध्ये वायू प्रदूषण आणि वंध्यत्वाबाबत एक अभ्यास करण्यात आला. वायू प्रदूषणामुळे वंध्यत्वाचा धोका वाढू शकतो, असे आढळून आले. चीनमधील 18,000 विवाहित जोडप्यांवर केलेल्या या अभ्यासात असे आढळून आले की, जोडपे जास्त प्रदूषित हवेच्या संपर्कात असतात त्यांना वंध्यत्वाचा धोका 20% जास्त असतो.
ADVERTISEMENT
