Govt Job : 'गेल इंडिया लिमिटेड'मध्ये मोठ्या पदांवर नोकरीची संधी! कोणाला करता येणार अर्ज?

Govt Job opportunity 2024 : 'गेल इंडिया लिमिटेड'मध्ये मोठ्या पदांवर भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 11 डिसेंबर 2024 (06:00 PM) पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

Mumbai Tak

रोहिणी ठोंबरे

• 05:59 PM • 16 Nov 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

'गेल इंडिया लिमिटेड'मध्ये मोठ्या पदांवर भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 11 डिसेंबर 2024 (06:00 PM) पर्यंत अर्ज करू शकतात.

point

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

Govt Job opportunity 2024 : 'गेल इंडिया लिमिटेड'मध्ये मोठ्या पदांवर भरती होत आहे. सिनियर इंजिनिअर, सिनियर ऑफिसर, सिनियर ऑफिसर (Medical Services), ऑफिसर (Laboratory), ऑफिसर (Security), ऑफिसर (Official Language), चीफ मॅनेजर अशा एकूण 7 पदांवर 275 जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 11 डिसेंबर 2024 (06:00 PM) पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job opportunity 2024 in GAIL India Limited for big posts know the about eligibility )

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • पद क्र.1: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.2: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/ CMA (ICWA) किंवा पदवीधर +MBA किंवा LLB    (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.3: (i) MBBS (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.4: (i) 60% गुणांसह  M.Sc. (Chemistry)  (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) 60% गुणांसह पदवीधर  (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) 60% गुणांसह हिंदी / हिंदी साहित्य पदव्युत्तर पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Economics / Applied Economics/ Business Economics/ Econometrics) किंवा 55% गुणांसह LLB + 12 वर्षे अनुभव  किंवा MBBS +09 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Priyanka Gandhi: "महिलांनो सतर्क व्हा,1500 रुपयात...", लाडकी बहीण योजनेवरून प्रियांका गांधींनी केलं मोठं आवाहन

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय,

  • पद क्र.1 & 2: 28 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3 & 4: 32 वर्षांपर्यंत
  • पद क्र.5: 45 वर्षांपर्यंत
  • पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.7: 40 /43 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या General/OBC/EWS कॅटेगरीतील उमेदवारांकडून 200 रूपये शुल्क आकारले जात आहे. 
  • तर, SC/ST/PWD कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार आहे.  

अधिक माहितीसाठी गेल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.gailonline.com/ वरून माहिती मिळवू शकता.

    follow whatsapp