Pitru Paksha 2023 : पितृपक्षात कावळ्यांना नेवैद्य का दिला जातो? तुम्हाला यामागची माहितीये का?

Pitru Paksha 2023: पितृ पक्षाचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यावर्षी पितृ पक्ष शुक्रवार (29 सप्टेंबर 2023) पासून सुरू झालं असून ते 14 ऑक्टोबरला संपेल. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध व तर्पण केले जाते.

Mumbai Tak

रोहिणी ठोंबरे

• 09:08 AM • 29 Sep 2023

follow google news

What Is Importance of Pitru Paksha in India : पितृ पक्षाचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यावर्षी पितृ पक्ष शुक्रवार (29 सप्टेंबर 2023) पासून सुरू झालं असून ते 14 ऑक्टोबरला संपेल. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध व तर्पण केले जाते. यावेळी पितरांना तिथीनुसार नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांच्या आवडीचे पदार्थही तयार केले जातात. पितृ पक्षाच्या काळात ब्राह्मणांना भोजन आणि दान केले जाते. (In Pitru Paksha Why People Offering food to crows Know The History)

हे वाचलं का?

या काळात लोक पितरांच्या नावाने कावळ्यांना अन्न देतात. हिंदू धर्मात कावळ्यांना पूर्वजांचा दर्जा देण्यात आला आहे. पितृ पक्ष असो किंवा कोणताही शुभ कार्यक्रम, लोक आपल्या पूर्वजांचे स्मरण करून कावळ्यांना अन्न देतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पितृ पक्षात फक्त कावळ्यांनाच का खायला दिले जाते आणि त्याचे महत्त्व काय आहे? चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

Mulund : ‘…तर गालावर वळ उठतील’, राज ठाकरे कडाडले; शिंदे सरकारलाही सुनावलं

कावळ्यांना पूर्वजांचा मान का दिला जातो?

धार्मिक मान्यतेनुसार, पितृ पक्षाच्या काळात पूर्वज कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात. देवतांसह कावळ्यांनीही अमृत चाखले होते असे शास्त्रात वर्णन केले गेले आहे. त्यामुळे असे मानले जाते की, कावळे नैसर्गिकरित्या मरत नाहीत. कावळे न थकता लांबचा प्रवास करू शकतात. अशा वेळी कोणत्याही प्रकारचा आत्मा कावळ्याच्या शरीरात राहू शकतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो.

या कारणांमुळे, पितृ पक्षात कावळ्यांना अन्न दिलं जातं. त्याच वेळी, धार्मिक मान्यतांनुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याचा जन्म कावळ्याच्या पोटी होतो. यासाठी पितरांना कावळ्यांद्वारे अन्न अर्पण केले जाते.

उत्तर दिलं नाही म्हणून विद्यार्थ्यासोबत असं काही केलं की शिक्षिकेला झाली अटक

पितृपक्षात कावळ्यांव्यतिरिक्त आणखी कोणाला अन्न देता येते?

पितृ पक्षामध्ये कावळ्यांव्यतिरिक्त गाय, कुत्रे आणि पक्ष्यांनाही अन्न दिले जाते. असे मानले जाते की त्यांच्याकडून अन्न स्वीकारले नाही तर ते पितरांच्या नाराजीचे लक्षण मानले जाते.

PCOD म्हणजे काय? तो का होतो आणि त्यावर उपाय काय? समजून घ्या सगळं…

पितृ पक्षात कावळ्यांना अन्न देण्याची कहाणी काय?

पौराणिक कथेनुसार इंद्रदेवाचा मुलगा जयंत याने कावळ्याचे रूप धारण केले होते. एके दिवशी कावळ्याने माता सीतेच्या पायावर चोच मारली, रामजी हा संपूर्ण प्रसंग पाहत होते. त्यांनी सुख्या गवताची एक काठी मारली तेव्हा ती कावळ्याच्या एका डोळ्यावर लागली. त्यामुळे कावळ्याचा एक डोळा खराब झाला. कावळ्याने आपल्या चुकीबद्दल श्रीरामांची माफी मागितली. कावळ्याच्या माफीने प्रभू राम प्रसन्न झाले आणि पितृ पक्षात कावळ्याला दिलेले अन्न पितृलोकात राहणार्‍या पूर्वज देवतांना मिळेल असे आशीर्वाद दिले.

    follow whatsapp