घरात घुसून वहिनीवर चाकूने वार केले अन् काही तासांतच झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिराचा मृतदेह... नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 10:45 AM • 01 Mar 2026

एका तरुणाने घरात घुसून वहिनीवर चाकूने निर्दयी हल्ला केल्याचं वृत्त आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर काही तासांतच आरोपी दिराचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.

वहिनीवर हल्ला केल्यानंतर दिराची आत्महत्या...

वहिनीवर हल्ला केल्यानंतर दिराची आत्महत्या...

Google CTA

बातम्या हायलाइट

point

घरात घुसून वहिनीवर चाकूने वार केले अन्...

point

काही तासांतच झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिराचा मृतदेह आढळला

Crime News: उत्तर प्रदेशातील झाशी येथून एक संतापजनक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या वाहिनीवर चाकूने हल्ला केला आणि काही तासांनंतर, स्वत:चं आयुष्य संपवल्याचं वृत्त आहे. संबंधित घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. सध्या, पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, पीडितेची प्रकृती नाजूक आहे. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना ही झाशीच्या नैनागड गावात घडली. 36 वर्षीय माया देवी अशी घटनेतील पीडित महिलेची ओळख समोर आली असून तिला गंभीररित्या जखमी अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माया देवी तिचा पती राकेश साहू याच्यासोबत नैनागड येथे राहत होती. 

वहिनीवर चाकूने वार केले अन्... 

राकेशने पोलिसांना माहिती दिली की, शनिवारी सकाळच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला. त्यादरम्यान, सकाळी जवळपास 9 वाजताच्या सुमारास त्याचा चुलत भाऊ महेंद्र साहू (30) हा हीरापुरा गावातून नैनागड येथील राकेशच्या घरी आला आणि त्यावेळी घरी कोणी नसताना महेंद्रने त्याची वहिनी माया देवी हिच्यावर चाकूने बरेच वार केला आणि घटनास्थळावरून फरार झाला. 

हे ही वाचा: मोठी बातमी! नागपुरात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट, 15 जणांचा मृत्यू तर 18 जखमी

दिरासोबतच्या प्रेमसंबंधावरून वाद 

पुढे राकेशने पोलिसांना सांगितलं की, जवळपास दोन वर्षांपूर्वी त्याचा महेंद्रसोबत मोठा वाद झाला होता. खरं तर, आरोपी महेंद्र आणि पीडिता माया देवी यांच्या प्रेमसंबंध होते आणि त्याच कारणावरून त्याचा राकेशसोबत वाद झाला होता. त्यावेळी कुटुंबियांनी हस्तक्षेप करून ते प्रकरण तिथे मिटवलं. मात्र, महेंद्रच्या मनात त्याविषयी प्रचंड राग होता आणि रागाच्या भरात त्याने हे भयानक कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांच्या मदतीने माया देवीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली केल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा: काकूचा पुतण्यावर जीव जडला, नवरा बाहेर जाताच पळून गेली, गावभर चर्चा अन् शेवटी काय घडलं?

तसेच, संध्याकाळच्या सुमारास महेंद्र साहूचा मृतदेह परिसरातील एका मॅरेज हॉलजवळ झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. वृत्तानुसार, ही घटना आत्महत्या असल्याचं प्राथमिक तपासातून स्पष्ट होत आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आता, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.