काकूचा पुतण्यावर जीव जडला, नवरा बाहेर जाताच पळून गेली, गावभर चर्चा अन् शेवटी काय घडलं?

मुंबई तक

01 Mar 2026 (अपडेटेड: 01 Mar 2026, 09:50 AM)

Crime News : ज्या पुतण्यावर कुटुंबाने विश्वास टाकला, त्यानेच घराची मर्यादा ओलांडल्याने ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या नात्यांबद्दल अविश्वास निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. पती अजित कुमार आणि त्यांचे कुटुंबीय या घटनेमुळे पूर्णपणे खचले आहेत.

Crime News Hindi

Crime News Hindi

Google CTA

बातम्या हायलाइट

point

काकूचा पुतण्यावर जीव जडला

point

नवरा बाहेर जाताच पळून गेली

point

गावभर चर्चा अन् शेवटी काय घडलं?

Crime News ,मैनपुरी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील कुर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेगमपूर करहल गावातून माणुसकी आणि नात्यांना लाजवणारी घटना समोर आली आहे. येथे एका काकूने आपल्याच सख्ख्या पुतण्यासोबत पळ काढल्याने संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली असून बातमी समजताच संपूर्ण कुटुंबाला धक्का बसलाय. 

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बेगमपूर करहल येथील रहिवासी अजित कुमार यांचा संसार सुरळीत सुरू होता. दोन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी सुमन अचानक रात्रीच्या वेळी घरातून बेपत्ता झाली. सुरुवातीला कुटुंबियांनी नातेवाईकांकडे आणि परिसरात तिची खूप शोधाशोध केली, मात्र जेव्हा सत्य समोर आले तेव्हा सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. चौकशी दरम्यान असे समोर आले की, सुमन एकटी गेली नसून ती तिचा सख्खा पुतण्या हर्षित याच्यासोबत फरार झाली आहे. काकू आणि पुतण्यामध्ये गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध सुरू असल्याचे बोलले जात आहे. या अनैतिक संबंधांमुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाची वाताहत झाली आहे.

हेही वाचा : गडचिरोलीत बँकेची संवेदनशून्यता, कोमातील वृद्धेला न्यावे लागले थेट बँकेत; शाखा व्यवस्थापकाचा आडमुठेपणा

गावात चर्चेला उधाण, कुटुंबियांना मोठा धक्का

ज्या पुतण्यावर कुटुंबाने विश्वास टाकला, त्यानेच घराची मर्यादा ओलांडल्याने ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या नात्यांबद्दल अविश्वास निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. पती अजित कुमार आणि त्यांचे कुटुंबीय या घटनेमुळे पूर्णपणे खचले आहेत.

पोलीस तपास सुरू

याप्रकरणी पीडित कुटुंबाने कुर्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत बेपत्ता झाल्याची नोंद केली असून दोघांचा शोध सुरू केला आहे. "आम्ही पथके तयार केली असून संशयितांच्या संभाव्य ठिकाणांवर छापेमारी सुरू आहे. मोबाईल लोकेशन आणि सर्व्हिलन्सच्या मदतीने लवकरच दोघांना ताब्यात घेतले जाईल," अशी माहिती पोलीस स्टेशन प्रभारींनी दिली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

प्रेयसीनं अबोला धरला, प्रियकर स्कूटीवरुन 370 किमीचा प्रवास करुन पोहोचला अन् घडलं भयंकर