PM Modi Yavatmal : मोदी यवतमाळमध्ये पण, चर्चा 2014 मध्ये दिलेल्या गॅरंटीची!

भागवत हिरेकर

28 Feb 2024 (अपडेटेड: 28 Feb 2024, 05:56 PM)

PM Modi Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यातील दाभडीचे गावकरी मोदींना का करून देताहेत जुन्या घोषणांची आठवण?

मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?

what has modi promised to farmers in 2014

follow google news

PM Modi Yavatmal Visit : 2014, 2019 आणि आता 2024... 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू केलेल्या पायंडा मोदींनी यावेळीही कायम ठेवला. लवकरच लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, त्यापूर्वीच मोदी यवतमाळच्या दौऱ्यावर आलेत. मोदींच्या या दौऱ्यानिमित्त चर्चा सुरू झालीये ती 2014 मध्ये त्यांनी दिलेल्या गॅरंटीची! १० वर्षांपूर्वी मोदींनी यवतमाळमधील चाय पे चर्चा कार्यक्रमात शेतकऱ्यांना काय हमी दिली होती, त्या गॅरंटीचं काय झालं,  हेच समूजन घेऊयात... 

हे वाचलं का?

"आठवणीतील चाय पे चर्चा... मा. श्री. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तुम्ही दिलेल्या आश्वासनाचं काय झालं? कापसावर आधारित उद्योग आणणार होते, त्याचं काय झालं? शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणार होते, पुढे काय झालं? काळंधन वापस आणणार होते, आम्हाला काहीच समजलं नाही? विनीत समस्त गावकरी मंडळी, दाभडी."

हे वाचून तुम्ही म्हणाल हे काय आहे. हे शब्द आहेत एका बॅनरवरील. यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यात असलेल्या दाभडी गावात हा बॅनर लावण्यात आला आहे. दाभडी गावातील ग्रामस्थांनी या बॅनरमधून पंतप्रधान मोदींना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिलीये. दहा वर्षापूर्वी मोदींनी दाभडीतील शेतकऱ्यांना काय हमी दिली होती. हे जाणून घेण्याआधी मोदी आणि यवतमाळच्या कनेक्शनबद्दल जाणून घेऊयात...

मोदी आणि यवतमाळ

28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान मोदी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. लोकसभा निवडणुकीच्या आधी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करण्याची मोदींची ही तिसरी वेळ आहे. 2014 मध्ये भाजपने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांची घोषणा केली. त्यानंतर मोदींनी चाय पे चर्चा कार्यक्रम यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात घेतला होता. 

हेही वाचा >> मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, काँग्रेसचं सत्तेचं गणित बिघडलं?

2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळीही मोदी यवतमाळमध्ये आले होते. महिला मेळाव्यात आले होते. त्यावेळी त्यांनी महिलांसाठी काही योजनांची घोषणा केली होती. पण, त्यांनी केलेल्या घोषणा अपूर्णच राहिल्याचे स्थानिक नागरिक म्हणताना दिसत आहेत. 

2014 मध्ये मोदींनी शेतकऱ्यांना काय दिली होती हमी?

यवतमाळ जिल्ह्यातील दाभडीमध्ये चाय पे चर्चा कार्यक्रम झाला होता. 20 मार्च 2014 रोजी झालेल्या या कार्यक्रमात मोदींनी शेतकरी आत्महत्या, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, हमी भाव आदी मुद्द्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. 

आर्णी तालुक्यातील दाभडी गावात लावण्यात आलेले बॅनर.

शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोदींनी फाईव्ह एफ चा फॉर्म्युला सांगितला होता. विदर्भात मोठ्या प्रमाणात कापूस पिकतो, त्याला विदेशात पाठवू, अशी हमी त्यांनी दिली होती. फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन, अशी पंचसुत्री त्यांनी सांगितली होती. शेतकऱ्यांना शेती खर्चाच्या ५० टक्के नफा, पीक विमा हप्ता भरण्यासाठी कर्ज, मोठ्या सुतगिरण्या, कापड गिरण्यांची उभारणी, कमी व्याजात जास्त कर्ज, शैक्षणिक कर्जाची शासकीय हमी अशा घोषणा मोदींनी केल्या होत्या.

हेही वाचा >> 'अशोक चव्हाण अजगरा एवढे मोठे होतील?' 

मोदींनी केलेल्या घोषणा हवेतच विरल्याचे चित्र आहे. पांढरे सोने पिकवणाऱ्या यवतमाळमधील शेतकऱ्यांच्या ना आत्महत्या थांबल्या, ना त्यांना शेतीतील खर्चापेक्षा ५० टक्के जास्त नफा मिळतोय. ही परवड तशीच सुरू असल्याने पुन्हा एकदा दाभडीतील ग्रामस्थांनी मोदींना त्यांनी दिलेल्या गॅरंटीची आठवण करून दिलीये.

    follow whatsapp