Ajit Gopchade : 'अशोक चव्हाण अजगरा एवढे मोठे होतील?', भाजप खासदाराच्या विधानाने चर्चांना उधाण
Ajit Gopchande Big Statement On Ashok Chavan : 'चव्हाण साहेब आता तुम्ही आमच्यात आलात आहात. तुम्हाला हळूहळू सर्व सिस्टीम समजायला उशीर लागेल. मात्र मला असं वाटतंय की तुम्ही आतमध्ये जाऊन अजगराएवढे मोठे होतात की काय अशी शंका उपस्थित केली.
ADVERTISEMENT
Ajit Gopchande Big Statement On Ashok Chavan : कुवरचंद मंडले, नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रवेश केला होता. मात्र भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना अशोक चव्हाणांच्या पक्ष प्रवेशाचे गणित सुटेना झाले आहे, असे चित्र आहे. कारण भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांनी चक्क चव्हाण (Ashok Chavan) यांच्या उपस्थित त्यांना अजगराची उपमा देऊन शंका उपस्थित केली आहे. नेमकं कुणी ही उपमा दिली आहे, हे जाणून घेऊयात. (ajit gopchade big statement on ashok chavan bjp mp maharashtra politics)
भाजपची नुकतीच बुथ कार्यकर्ता बैठक पार पडली होती. या बैठकीला खासदार अशोक चव्हाण आणि खासदार अजित गोपछडे उपस्थितक होते. या कार्यक्रमात बोलताना अजित गोपछडे यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : देशाला मिळाले नवे Lokpal, कोण आहेत अजय खानविलकर?
अजित गोपछडे म्हणाले की, 'चव्हाण साहेब आता तुम्ही आमच्यात आलात आहात. तुम्हाला हळूहळू सर्व सिस्टीम समजायला उशीर लागेल. मात्र मला असं वाटतंय की तुम्ही आतमध्ये जाऊन अजगराएवढे मोठे होतात की काय अशी शंका उपस्थित केली. तसेच भारतीय जनता पार्टी ही भल्या भल्यांना समजत नाही, मलाही माहिती नव्हत खासदारकी साठी माझं नाव येईल, पण अचानक ते आलं, त्यामुळे भारतीय जनता पार्टी समजून घेण्यासाठी तिचे चिंतन आणि विचार करणे गरजेचे असल्याचेही गोपछडे यांनी सांगितले.
गोपछडे पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही समाजाची पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी ही हिंदुस्थानच्या परिवाराची पार्टी आहे. या पक्षाला समजण्यासाठी तिचा विचार, संघटना समजणे गरजेचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बुथचा कार्यकर्ता आहे. हा बुथचा कार्यकर्ताचा आपल्याला लोकसभा निवडणूक जिंकून देणार आहे आणि मोदींना 400 च्या पार नेणार आहे, असे अजित गोपछडे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, काँग्रेसचं सत्तेचं गणित बिघडलं?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT