Lokpal: देशाला मिळाले नवे लोकपाल, कोण आहेत अजय खानविलकर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

अजय खानविलकर यांनी स्वीकारला लोकपाल पदाचा कार्यभार
अजय खानविलकर यांनी स्वीकारला लोकपाल पदाचा कार्यभार
social share
google news

Lokpal Ajay Khanvilkar and PM Modi: संजय शर्मा, नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे  निवृत्त न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांनी भारताचे लोकपाल म्हणून पदभार स्वीकारला आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय समितीने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली होती. (former supreme court justice ajay khanvilkar is new lokpal of country who is on bench that gives a very important decision regarding prime minister modi)

न्यायमूर्ती खानविलकरांनी आतापर्यंत दिलेले महत्त्वाचे निकाल..

पीएमएलएचे नियम ठरवलेले योग्य

न्यायमूर्ती खानविलकर दोन वर्षांपूर्वी 29 जुलै 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पीएमएलए (PMLA)कायद्यातील दुरुस्ती कायम ठेवणारा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता.

हे ही वाचा>> Jarange: 'तो' फोन आला अन् मनोज जरांगे एका झटक्यात...

खंडपीठाने अंमलबजावणी संचालनालयाचे (ED)अधिकार आणि अधिकार क्षेत्र परिभाषित केले होते. कोणत्याही आरोपीला बोलावणे, अटक करणे, झडती घेणे आणि प्रकरणाशी संबंधित साहित्य जप्त करण्याचा ईडीचा अधिकार कायम ठेवण्यात आला होता. यासोबतच ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर कबुलीजबाब देण्यासाठी व्यापक अधिकार देण्यात आले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना देण्यात आलेली क्लीन चिट

याशिवाय न्यायमूर्ती खानविलकर यांनी 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देणाऱ्या खंडपीठाचे देखील नेतृत्व केले होते.

याच प्रकरणात याचिकाकर्त्या तीस्ता सेटलवाड यांनी पंतप्रधान मोदींना दंगल आणि हिंसाचारात अडकवण्यासाठी बनावट पुरावे सादर केल्याबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यानंतर तीस्ता सेटलवाड यांना अटक करण्यात आली होता. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> बंडखोर आमदारांचा काँग्रेसला राज्यसभा निवडणुकीत झटका!

सेंट्रल व्हिस्टाचा मार्ग केलेला मोकळा

याशिवाय सेंट्रल व्हिस्टा आणि नवीन संसद भवनाच्या बांधकामासंबंधी सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवाद्यांनी अनेक याचिका दाखल केल्या होत्या आणि या प्रकल्पाबाबत आपत्ती दर्शवली होती. मात्र, या सगळ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या होत्या. आणि सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता दिली होती. या प्रकरणी निर्णय देणाऱ्या खंडपीठामध्ये देखील न्यायमूर्ती खानविलकर हे होते.

ADVERTISEMENT

राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती खानविलकर यांच्यासह न्यायमूर्ती लिंगप्पा नारायण स्वामी, न्यायमूर्ती संजय यादव आणि न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांची लोकपालचे अन्य न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती अवस्थी हे विधी आयोगाचे अध्यक्षही आहेत. त्यांच्याशिवाय सुशील चंद्रा, पंकज कुमार आणि अजय तिर्की हे गैर-न्यायिक सदस्य आहेत.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT