PM Modi: 'गर्भपात रोखण्यासाठी कायदे केले', महिलांसाठीच्या योजनांवर मोदींचं मोठं भाष्य

मुंबई तक

pm narendra modi Congress women 70 years special schemes criticized

ADVERTISEMENT

pm narendra modi
pm narendra modi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'गर्भपात रोखण्यासाठी कायदे केले'

point

'मुलींच्या शिक्षणासाठी नवं शैक्षणिक धोरण आणलं'

point

'गर्भवती महिलांसाठी विशेष योजना'

PM Narendra Modi: 'भारत सशक्त झाल्यास जगाचं हित होईल' असं विश्वास व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी गेल्या 70 वर्षात देशात जे काम झालं नाही, ते आम्ही या दहा वर्षात केलं असल्याचं सांगत त्यांनी महिलांसाठी भाजप (BJP) सरकारने काय काय केले त्याची नरेंद्र मोदी यांनी यादीच वाचून दाखवली. नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, 'गेल्या कित्येक वर्षात गर्भातच संपवल्या जाणाऱ्या क्रूर घटनेला पायबंद घालण्यासाठी आम्ही कायदे केले आणि महिलांसाठी मोठं कामं केल्याचंही नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं.' 

गर्भवती महिलांसाठी विशेष योजना

'देशाचा विकास करायचा असेल तर महिलांनाही वेगळी संधी देणं गरजेचं आहे. कारण महिलांनी केलेल्या कामाची दखल गेल्या कित्येक वर्षापासून घेतली गेली नाही. त्यामुळे आम्ही आमच्या सरकारने अनेक विशेष योजना आणून महिलांना मुख्य प्रवाहात आणि त्यांच्यासाठी कायदे केले असंही मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी ज्या कळ्यांना गर्भातच खोडून टाकले जात होते, त्या गोष्टींना पायबंद आणण्यासाठी कायद्याद्वारे त्यावर तोडगा काढल्याचेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

हे ही वाचा >> आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक -मोदी

गर्भपात रोखण्यासाठी कायदे केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना सांगितले की, 'कोट्यवधी लोकांचं स्वप्न साकार करण्याचा संकल्प मी केला आहे. ते स्वप्न साकार करण्यासाठी युवा शक्ती, नारी शक्ती, गरीब, शेतकऱ्यांना देशाचा विकास घडवून आणयाचा आहे. मात्र देशात होणारा गर्भपात हा चिंतेचा विषय होता. त्यामुळे गर्भपात रोखण्यासाठी रोखण्यासाठी कायदे केले. त्यामुळे गर्भपात थांबले आणि महिलांना दिलासा देण्याचाही प्रयत्न झाला असंही त्यांनी यावेळी सांगितले. 

 नवी दारं खुली

महिलांसाठी फक्त एकाच प्रकारच्या योजना आणल्या नाहीत तर त्यांच्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणात त्यांना महत्वाचं स्थान देऊन मुलींसाठी शिक्षणाची नवी दारं खुली केली. त्यामुळे नक्कीच त्यांच्या विकासाला चालना मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. 

संसदेत महिलांना आरक्षण

गेल्या कित्येक वर्षापासून महिलांच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र त्या महिला आरक्षण मिळवण्यासाठी आणि त्यांच्या नेतृत्वाला पुढं आणण्यासाठी आम्ही तीन दशकानंतर संसदेत महिलांना आरक्षण आणण्याचं महत्वाचं काम आम्ही केलं असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

हे ही वाचा >> अजित पवारांचे बोल जिव्हारी; सुप्रिया सुळेंचा पलटवार; म्हणाल्या...

हे वाचलं का?

    follow whatsapp