Himachal Political Crisis : मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, काँग्रेसचं सत्तेचं गणित बिघडलं?
Himachal Political Crisis : राज्यसभा निवडणुकीनंतर बहुमत असलेले काँग्रेसचे सरकार अस्थिर बनले आहे. विक्रमादित्य सिंह यांच्या राजीनाम्याने आणखी अडचणी वाढल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हिमाचल प्रदेशातील सरकार अस्थिर

काँग्रेसच्या आमदारांचं मुख्यमंत्र्यांविरोधात बंड

काँग्रेस समोर सरकार स्थिर करण्याचे आव्हान
Himachal pradesh Political Crisis : हिमाचल प्रदेशात प्रत्येक क्षणाला राजकीय परिस्थिती बदलताना दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर सुक्खू सरकार बहुमतांसाठी लागणाऱ्या आकड्यांच्या खेळात अडकले आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असलेल्या विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेससमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह, जे सुक्खू सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.
विक्रमादित्य सिंह यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवरही जोरदार हल्ला चढवला. राज्यसभा निवडणुकीत एक दिवस आधी क्रॉस व्होटिंग करणारे सहा आमदारही याच गटातील असल्याचे सांगण्यात आले. आमदारांच्या क्रॉस व्होटिंगनंतर विक्रमादित्यही उघडपणे पुढे आले आणि त्यांनी सरकारवर आरोप केले.
राजीनामा देताना विक्रमादित्य सिंह काय बोलले?
विक्रमादित्य यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय त्यांची आई प्रतिभा सिंह आणि विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री यांना दिले. ज्या वीरभद्र सिंह यांच्या नावाचा वापर करून काँग्रेस निवडणूक जिंकली. त्यांचाच पुतळा उभारण्यासाठी शिमल्यातील मॉल रोडवर जमीन दिली नाही.