Mumbai News: खरंतर, संसार म्हटला तर भांड्याला भांडं लागणं आलंच, अशी म्हण आपण नेहमी ऐकतो. तसेच नवरा आणि बायकोमधील भांडणाच्या घटना सुद्धा आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. मात्र, बऱ्याचदा अशा नवरा आणि बायकोमधील असा किरकोळ वादांमुळे मोठे परिणाम घडल्याच्या सुद्धा बातम्या समोर येतात. मुंबईमधील एका दाम्प्त्यामध्ये अशीच काहीशी घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. यावेळी महाबळेश्वरला निघालेल्या पती आणि पत्नीमधील क्षुल्लक वादामुळे नवऱ्याने त्याच्या बायकोला तोंडावर ठोसा मारला. यामुळे त्याच्या बायकोचे दोन दात गाडीतच पडून ती जखमी झाल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
मुंबईतील गोरेगाव येथील रहिवासी असलेलं एक जोडपं महाबळेश्वरला गाडीतून फिरण्यासाठी निघालं होतं. गाडीतून जात असताना गाडीतील एसी चालू बंद करण्याच्या क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. मात्र या वादात नवऱ्याने त्याच्या बायकोच्या तोंडावर जोरात ठोसा मारला आणि यादरम्यान महिलेचे दोन दात गाडीतच पडून ती जखमी झाली.
हे ही वाचा: Pune: दिवंगत पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार; पोलिसांनी FIR साठी लावले 21 दिवस
ही घटना वाशी टोलनाका मार्गावर घडली असल्याची माहिती मिळाली आहे. खरंतर, एका बुक्कीत दात पाडल्याचं ऐकून अनेकांना ही गंमतीशीर बाब वाटत असली तरी नवरा आणि बायकोमधील क्षुल्लक कारणावरून झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहचू शकतो, हे या घटनेतून समजतंय.
हे ही वाचा: हसावं की रडावं! प्रेयसीने प्रियकरासाठी केली चोरी, कारण ऐकूण व्हाल चकीत
पोलिसांकडे तक्रार
याप्रकरणी आता पीडित महिलेने मुंबई पोलिसांकडे तिच्या पती विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी देखील या तक्रारीची दखल घेत कारवाई करण्याकडे धाव घेतली आहे. पत्नीने आपल्या पतीविरुद्ध केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि तो वाशी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
