12th Fail: IRS अधिकारी बनण्यासाठी डॉक्टरी सोडणाऱ्या श्रद्धा जोशी कोण?

रोहिणी ठोंबरे

30 Jan 2024 (अपडेटेड: 30 Jan 2024, 12:27 PM)

IRS Shraddha Joshi : विधू विनोद चोप्रा यांचा 12th Fail चित्रपट सध्या संपूर्ण भारतात प्रचंड चर्चेत आहे. तरूणाईच्याही पसंतीस तो उतरला आहे. ही एक खरी कहाणी आहे जी IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि त्यांची पत्नी IRS अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या जीवनावर आधारित आहे.

12th-fail-movie-real-shraddha-joshi-who-quit-doctoring-to-become-irs-officer

12th-fail-movie-real-shraddha-joshi-who-quit-doctoring-to-become-irs-officer

follow google news

IRS Shraddha Joshi : विधू विनोद चोप्रा यांचा 12th Fail चित्रपट सध्या संपूर्ण भारतात प्रचंड चर्चेत आहे. तरूणाईच्याही पसंतीस तो उतरला आहे. ही एक खरी कहाणी आहे जी IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि त्यांची पत्नी IRS अधिकारी श्रद्धा जोशी (IRS Shraddha Joshi) यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात त्यांची भूमिका अभिनेता विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर यांनी साकारली आहे.

हे वाचलं का?

सोशल मीडियावर या चित्रपटाचं भरभरून कौतुक होत आहे. लोक वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून चित्रपटाची प्रशंसा करत आहेत. या सर्व चर्चांमध्ये, आज आपण रील नाही तर रियल IRS अधिकारी श्रद्धा जोशीबद्दल अधिक जाणून घेऊयात.

वाचा : Rajya Sabha Election 2024 : ठाकरेंच्या आमदारांना शिंदेंचा व्हीप पाळावा लागणार?

IRS अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या करिअरची कशी झाली सुरूवात?

श्रद्धा जोशी यांचा जन्म 5 मार्च 1979 मध्ये झाला. त्या मूळच्या उत्तराखंडमधील अल्मोडा येथील आहेत. त्यांचं शालेय शिक्षणही अल्मोडा येथेच झालं. श्रद्धा जोशी अत्यंत हुशार आणि अभ्यासाप्रती प्रामाणिक विद्यार्थी होत्या. शालेय शिक्षणानंतर, त्यांनी हरिद्वारच्या गुरुकुल कांगरी येथे आयुर्वेदिक औषध आणि शस्त्रक्रिया या विषयात बॅचलरचे शिक्षण घेतले.

श्रद्धा जोशी यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर उत्तराखंडमधील रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम केले. पण, त्यानंतर त्यांना नागरी सेवेची तयारी करण्याची इच्छा झाली. आतून तेच करायचं आहे अशी इच्छा जाणीव भासू लागली. यामुळे, UPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी, त्या दिल्लीला गेल्या आणि योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी दृष्टी IAS कोचिंग संस्थेत प्रवेश घेतला.

वाचा : ‘मुंबईची साफसफाई करण्याचं काम ठाकरे सेनेनं…’, सोमय्यांचा राऊतांवर पलटवार

त्यांनी 2007 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी होण्यासाठी AIR 121 मिळवले. यूपीएससी तयारीच्या दिवसांत श्रद्धा जोशी यांची मनोज शर्मा यांच्याशी कोचिंगमध्ये भेट झाली आणि दोघेही प्रेमात पडले आणि पुढे लग्नही झाले. मनोज शर्मा हे आयपीएस अधिकारी आहेत आणि त्यांना ‘सिंघम’ या टोपण नावाने ओळखले जाते.

    follow whatsapp