स्मिता शिंदे :
ADVERTISEMENT
पुणे : मुंबईत फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचं आमिष दाखवत आणि ऑडिशन घेण्याच्या निमित्ताने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथून उघडकीस आली आहे. या प्रकरणात चाकणमधील उद्योगपती राजेंद्र गायकवाडवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयित राजेंद्र गायकवाड यांनी एका फिल्मसाठी ऑडिशन घ्यायची आहे असं म्हणतं आळेफाटा येथील पिडीत मुलीला पुण्यातील मोठ्या हॉटेल रूममध्ये बोलावलं. त्यावेळी पिडीत मुलीला आणि आई-वडिलांना काही डायलॉग बोलण्यास सांगितलं. काही वेळातच “तुम्हाला ती लाजत आहे, तुम्ही बाहेर बसा” असं सांगून मुलीच्या आई – वडिलांना बाहेर पाठवलं. यानंतर मुलीला स्वतः सोबत डान्स करून दाखवायचा आहे असं सांगत डान्स करताना पाठीवरुन आणि अंगावरून हात फिरवून हा ऑडिशनचा भाग असल्याचं सांगितलं.
पुढे 8 नोव्हेंबरला मुलीच्या वडिलांना फोन करून कामानिमित्त आळेफाटा इथं येणार असल्याचं सांगितलं. “तिथं येऊन मुलीचे ऑडिशन घेतो आणि तिच्यात काय सुधारणा झाली आहे ते पाहू” असं कारण सांगितलं. त्यानंतर मुलीच्या राहत्या घरात येऊन आई-वडिलांना बाहेर पाठवून पिडीत मुलीला “तुला करिअर करायचे असेल तर बिकनीवर ऑडिशन द्यावी लागेल” असं सांगितलं.
बिकनीवर ऑडिशन देत असताना मुलीच्या पाठीमागून येऊन मिठी मारली आणि ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा धमकी देऊन बळजबरीने जबरदस्ती करून शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर सर्वांना धमकी देऊन तिथून तो निघून गेला, असा आरोप आहे. याप्रकरणी पिडीतीचे तक्रारीनंतर राजेंद्र दगडू गायकवाड यांचे विरुद्ध आळेफाटा पोलिसांनी 376 (2)(i), 354, 354(A) 506 आणि ‘पोस्को’ 4,6,8,12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक रागिणी कराळे तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
