इम्तियाज जलील यांना मारहाण करण्याचा प्रयत्न, काँग्रेस उमेदवाराच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप VIDEO

Former MP Imtiaz Jaleel car was attacked by AIMIM workers : काँग्रेस उमेदवार कलीम कुरेशी यांच्या समर्थकांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप जलील यांच्या समर्थकांनी केलाय. दरम्यान, या प्रकरणी आमच्या भागात करुन आरेरावी केल्याने हा प्रकार घडल्याचं स्पष्टीकरण कुरेशी यांनी दिलंय.

AIMIM

AIMIM

मुंबई तक

07 Jan 2026 (अपडेटेड: 07 Jan 2026, 03:36 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला

point

AIMIM नाराज कार्यकर्त्यांकडूनच इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला

Former MP Imtiaz Jaleel car was attacked by AIMIM workers : छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आलीये. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला करण्यात आलाय. शिवाय त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलाय. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपुरा–जिन्सी परिसरात प्रचार रॅलीच्या वेळी घडली. काँग्रेस उमेदवार कलीम कुरेशी यांच्या समर्थकांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप जलील यांच्या समर्थकांनी केलाय. दरम्यान, या प्रकरणी आमच्या भागात येऊन आरेरावी केल्याने हा प्रकार घडल्याचं स्पष्टीकरण कुरेशी यांनी दिलंय.

हे वाचलं का?

हेही वाचा : परभणी : 36 वर्षीय इंजिनिअरला कार चालवताना ह्रदय विकाराचा झटका, गाडी रस्त्याच्या कडेला घेतली, पण व्हायचं तेच झालं

अधिकची माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपुरा–जिन्सी परिसरात इम्तियाज जलील यांच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पदयात्रा संपल्यानंतर जात असताना जलील यांच्या कारवर हल्ला करण्यात आलाय. सुरुवातीला जलील यांना कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. मात्र, त्यानंतर कारवर हल्ला करण्यात आलाय. या गोंधळात जलील यांच्या गाडीतील मागील सीटवर बसलेल्या एका व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. तसेच एमआयएमचा एक कार्यकर्ता जखमी झाल्याची माहिती आहे. इतर कार्यकर्त्यांबाबत पोलीस चौकशी सुरू आहे.

कलीम कुरेशी हे काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, या संपूर्ण घटनेमागे त्यांचाच हात असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी केला आहे. संभाजीनगरमध्ये एमआयएमने तब्बल 22 विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापत नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्या निर्णयामुळे पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती. त्याचे पडसाद बायजीपुरा भागात उमटल्याचे दिसून आले होते. आज झालेल्या गोंधळात एका व्यक्तीला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. कलीम कुरेशी हे प्रभाग क्रमांक 9 मधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असून, प्रभाग क्रमांक 14 मधून ते काँग्रेसचे उमेदवार आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

छत्रपती संभाजीनगर: सिगारेटचे चटके अन् गळा चिरून मित्राचाच निर्घृण खून! हत्येपूर्वी, मृताच्या आईला फोनवर धमकी...

    follow whatsapp