मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election)पार्श्वभूमीवर आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. त्यातही शिवसेना विरुद्ध शिवसेना UBT असा सामना सातत्याने पाहायला मिळत आहे. अशातच आता शिवसेना UBT चे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत एक मोठा खुलासा केला आहे. मुंबई Tak च्या महाचावडीवर आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी महाचावडी पार पडली. ज्यामध्ये आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली.
ADVERTISEMENT
'ठाकरे ब्रँडचा बँड वाजवा...' अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकतीच केली होती. त्यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
'बरं 20 जूनला जेव्हा पळालात तुम्ही.. त्याच्या एक महिना आधी उद्धव साहेबांनी त्यांना विचारलं होतं की, तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं आहे का? तेव्हा वर्षा बंगल्यावर येऊन रडून गेले होते. नाही.. जेलमध्ये जाईन.. हे वय नाही जेलमध्ये जाण्याचं... ठीकए राहा ना खुश आहे तिथे.. तुम्ही झुकलात ना दिल्लीसमोर.. राहा तिथे आनंदात.' असा खुलासा आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.
पाहा महाचावडीवर आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर काय केली टीका
'आता तुम्ही पाहिलंत तर फेकनाथ मिंधेंसारखा खोटारडा माणूस आणि निर्लज्ज माणूस मी कधीही आयुष्यात पाहिला नाही. अनेक लोकं पक्ष सोडून जातात. अनेक लोकं पक्ष बदलतात, त्यांना तुमची राजकीय विचारधारा पटत नाही. काही काही लोकं स्वार्थासाठी निघून जातात. दुसरीकडे जातात.. मंत्री बनतात, मुख्यमंत्री बनतात.. आनंदात राहतात. पण कधीही इतकं घाणेरडं राजकारण, खराब राजकारण मी पाहिलं नाही.'
हे ही वाचा>> महाचावडी: दोन 'ठाकरे' पहिल्यांदाच 'चावडी'वर एकत्र, Super Exclusive मुलाखत लवकरच मुंबई Tak वर!
'बरं तुम्ही गेलात तर गेलात ना.. तुम्ही आम्ही सुरक्षा काढून घेण्यापासून सगळं काही करता.. घाण, घाण बोलता.. बरं ठाकरे ब्रँड.. 2004, 2009 कोणी तुम्हाला तिकीट दिलं? 3 वेळा आमदार कोणी बनवलं, मंत्री कोणी बनवलं? नगरविकास खातं.. जे गेल्या 50 वर्षात कोणत्याही मुख्यमंत्र्यांने सोडलं नव्हतं ते कोणी तुम्हाला दिलं? या पलीकडे जाऊन काय करायचं होतं?'
'बरं 20 जूनला जेव्हा पळालात तुम्ही.. त्याच्या एक महिना आधी उद्धव साहेबांनी त्यांना विचारलं होतं की, तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं आहे का? तेव्हा वर्षा बंगल्यावर येऊन रडून गेले होते. नाही.. जेलमध्ये जाईन.. हे वय नाही जेलमध्ये जाण्याचं...'
हे ही वाचा>> ‘मी तेजस्वीच्या विरोधात नाही, पण...’, उद्धव ठाकरेंचा घोसाळकरांच्या वार्डात मास्टरस्ट्रोक, भाषण तुफान चर्चेत
'ठीकए राहा ना खुश आहे तिथे.. तुम्ही झुकलात ना दिल्लीसमोर.. राहा तिथे आनंदात. पण एवढी असुरक्षितपणा का आहे?' असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
कुठे आणि कधी पाहता येईल आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंची महाचावडी?
शिवसेना UBT नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांची महाचावडी ही आपल्याला मुंबई Tak च्या यूट्यूब चॅनलवर पाहता येईल. ही संपूर्ण मुलाखत आपल्याला उद्या (7 जानेवारी 2026) सायंकाळी 6.00 वाजता पाहता येईल.
ADVERTISEMENT











