महाराष्ट्रात भाजपची AIMIM सोबत युती, कोणत्या जिल्ह्यातील रणनिती? बहुमतासाठी निर्णय

BJP forms an alliance with AIMIM : अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये सत्तेसाठी भाजपने चक्क 'एमआयएम'सोबत आघाडी केलीये. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अकोटमध्ये भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. मात्र, 35 सदस्यांच्या नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळालं नाहीये. अकोटमध्ये 35 पैकी 33 जागांची निवडणूक झालीय. यात भाजपला 11 जागा मिळाल्यात.

BJP forms an alliance with AIMIM

BJP forms an alliance with AIMIM

मुंबई तक

07 Jan 2026 (अपडेटेड: 07 Jan 2026, 11:20 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात भाजपची AIMIM सोबत युती

point

कोणत्या जिल्ह्यातील रणनिती?

point

बहुमतासाठी निर्णय

BJP forms an alliance with AIMIM : 'पार्टी विथ डिफरंस' अशी ओळख सांगणाऱ्या भाजपने सत्तेसाठी सारीच तत्व गुंडाळून ठेवलीत का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये सत्तेसाठी भाजपने चक्क 'एमआयएम'सोबत आघाडी केलीये. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अकोटमध्ये भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. मात्र, 35 सदस्यांच्या नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळालं नाहीये. अकोटमध्ये 35 पैकी 33 जागांची निवडणूक झालीय. यात भाजपला 11 जागा मिळाल्यात.

हे वाचलं का?

आता अकोट नगरपालिकेत भाजपने आपल्या नेतृत्वात 'अकोट विकास मंच' स्थापन केलाय. या 'अकोट विकास मंचा'त भाजपनंतर सर्वाधिक 5 जागा जिंकणारा एमआयएम भाजपचा मित्रपक्ष झालाय. याशिवाय या आघाडीत ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष सहभागी झालाय. कालच या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलीये. भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर या नव्या आघाडीचे गटनेते असणार आहेत. या आघाडीतील सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना आता भाजपचा 'व्हिप' पाळावा लागणारेय. 13 जानेवारीला होत असलेल्या उपनगराध्यक्ष आणि स्विकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रितपणे मतदान करणार आहेत.

या आघाडीचे आता सध्याच्या 33 सदस्य संख्येत 25 सदस्य एकत्र झालेत. तर नगराध्यक्षा माया धुळे या 26 व्या सदस्य आहेत. अकोट नगरपालिकेत काँग्रेसचे 6 आणि वंचितचे 2 सदस्य विरोधी पक्षात असणार आहेत. अकोट नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवार फिरोजाबी सिकंदर राणा यांना भाजपच्या माया घुळे यांनी 5271 मतांनी पराभूत केले होते. अकोट नगरपालिकेत भाजपनंतर एमआयएमचे सर्वाधिक 5 नगरसेवक विजयी झाले आहेत. विधानसभेत 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा नारा देणाऱ्या भाजपने अकोटमध्ये थेट 'एमआयएम'शी आघाडी केल्याने ते विरोधकाच्या टिकेला कसे उत्तर देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अकोट नगरपालिकेतील पक्षीय बलाबल :

एकूण जागा : 35

निकाल जाहीर : 33 (2 जागांची निवडणूक नंतर होणार)

पक्षीय बलाबल :

भाजप : 11

काँग्रेस : 06

शिंदेसेना : 01

उबाठा : 02

वंचित : 02

अजित पवार राष्ट्रवादी : 02

शरद पवार राष्ट्रवादी : 01

प्रहार : 03

एमआयएम : 05

भाजपच्या नेतृत्वात बनलेल्या 'अकोट विकास मंचा'चे पक्षीय बलाबल :

भाजप : 11

एमआयएम : 05

शिंदेसेना : 01

उबाठा : 02

अजित पवार राष्ट्रवादी : 02

शरद पवार राष्ट्रवादी : 01

प्रहार : 03

एकूण : 25

इतर महत्त्वाच्या बातम्या 

भ्रष्टाचाराच्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी करुच नयेत, राज थेट बोलले; ठाकरे बंधूंच्या संयक्त महामुलाखतीचा टीझर

    follow whatsapp