Thane Crime News : ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 17 वर्षांच्या अपंग मुलीची तिच्याच आईनं हत्या केली. यानंतर, त्यांनी मृताच्या आजी आणि दुसऱ्या एका अनोळखी महिलेच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. हत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही. नौपाड्यातील गावदेवी परिसरात ही हत्या झाली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Indrajit Sawant : "तुमचे महाराज पळून गेले होते..." इंद्रजित सावंत यांना धमक्या देताना, शिवरायांबद्दल संतापजनक वक्तव्य
नौपाडा पोलिसांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 103(1) (खून), 238 (पुरावे नष्ट करणे) आणि 3(5) (एकाच हेतूने अनेक व्यक्तींनी केलेले गुन्हेगारी कृत्य) अंतर्गत तिन्ही महिलांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका 42 वर्षीय महिलेनं माहिती दिल्याने आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. जन्मापासूनच शारीरिक अपंगत्वामुळे, पीडित मुलीला चालता आणि बोलता येत नव्हतं. मुलगी अंथरुणाला खिळून होती. पोलिसांनी सांगितलं की, अहवालावरून असं दिसून आलं की ती 15 फेब्रुवारीपासून गंभीर आजाराने ग्रस्त होती.
19 फेब्रुवारीच्या रात्री, पीडितेच्या 39 वर्षीय आईनं तिला एक औषध दिलं ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी, पहाटे 1:39 वाजता, महिलेनं, तिच्या आई आणि आणखी एका अज्ञात महिलेसह, मुलीचा मृतदेह पांढऱ्या चादरीत गुंडाळला, कारमध्ये ठेवला आणि अज्ञात ठिकाणी नेऊन टाकला.
हे ही वाचा >>Santosh Deshmukh Case : मस्साजोगमध्ये आजपासून अन्नत्याग आंदोलन, दखल न घेतल्यास दोन दिवसानंतर...
पीडितेचे अवशेष कुठे टाकले, ते ठिकाण कोणतं होतं, सोबत कोण महिला होती हे शोधण्यासाठी पोलीस अधिक माहिती गोळा करत आहेत. तीन महिला मृतदेह गाडीत घेऊन जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. तसंच, माध्यमांशी बोलताना, मुलीच्या वडिलांनी म्हटलंय की, मुलगी अजूनही जिवंत आहे आणि ठाण्यात वैद्यकीय सेवा महाग असल्यानं तिला उपचारासाठी इतरत्र नेण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय समोर येणार ते पाहणं महत्वाचं आहे.
ADVERTISEMENT











