Pruthviraj chavan : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान पदाबाबत मोठं विधान केलं आहे. 'लवकरच देशाचा पंतप्रधान हा मराठी माणूस होईल', असं त्यांनी पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात 14 डिसेंबर रोजी वक्तव्य केलं. या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसतेय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'या' राशीतील लोकांचा आजचा दिवस कठीण जाणार, तर काहींच्या प्रगतीत अडथळे निर्माण होणार
नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "19 डिसेंबर रोजी काय होईल, ते आताच सांगणं कठीण आहे. याच प्रकरणात अनेक चर्चा सुरु आहेत. मला आशा आहे की काहीतरी नक्कीच घडेल, एक मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल."
त्यानंतर त्यांनी सांगितलं की, "काही लोकांनी फोन करून विचारलं असता, या वक्तव्याचा नेमका काय अर्थ लावायचा. जर मराठी व्यक्तीला पंतप्रधान बनवायचं असेल तर, सध्या जे पंतप्रधान आहेत, त्यांना ते पद सोडावं लागणार आहे. ही गोष्टी याआधी देखील नाव न घेता सांगितली होती. कुठेतरी यात बदल दिसून येईल, अशी शक्यता आहे. अशातच जरी बदल झाला असला तरीही पंतप्रधान काँग्रेसचा नसेल कारण काँग्रेसला बहुमत नाही."
अमेरिकेतील एका कायद्याचा संदर्भ देत चव्हाण म्हणाले की, ''19 डिसेंबर रोजी अमेरिकन काँग्रेसमधील एका कायद्यांतर्गत काही महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली जाईल. एलस्टाईन नावाच्या व्यक्तीशी संबंधित प्रकरणात मोठे खुलासे अपेक्षित आहेत. अनेक प्रमुख राजकारण्यांची नावे चर्चेत आली आहेत."
हे ही वाचा : कराड हादरलं! भाच्याने भरचौकात मामावर चाकूने केले वार, हल्ल्यात मामाचा दुर्दैवी अंत
काही नावे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याबाबत असे म्हटलं जातंय की, ''अंदाजे 75 हजार फोटो आणि 20 हजार ई-मेल उघड होतील. अमेरिकन काँग्रेसने स्पष्ट केलं की, ही सर्व माहिती शोधण्यायोग्य काँग्रेसनं स्पष्ट केलं की, ही सर्वच माहिती डाऊनलोड करू शकता. नेता कितीही मोठा असला तरी त्या नेत्याला संरक्षण दिलं जाणार नाही," असं त्यांनी वक्तव्य केलं.
ADVERTISEMENT











