डाव्यांच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलताच नरेंद्र मोदींचे मल्याळम भाषेत 3 ट्वीट; काय म्हणाले?

PM Narendra Modi on Thiruvananthapuram Corporation Election : हा निकाल राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. कारण तिरुवनंतपुरम जिल्हा हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांचा मतदारसंघ आहे. राज्याच्या राजधानीत भाजपने मिळवलेले हे यश पक्षासाठी ऐतिहासिक मानले जात आहे.

PM Narendra Modi on Thiruvananthapuram Corporation Election

PM Narendra Modi on Thiruvananthapuram Corporation Election

मुंबई तक

14 Dec 2025 (अपडेटेड: 14 Dec 2025, 12:16 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

केरळमध्ये डाव्यांना मोठा धक्का, तिरुवनंतपुरम महापालिकेत कमळ फुललं; 45 वर्षांच्या सत्तेला सुरुंग

point

डाव्यांच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलताच नरेंद्र मोदींचे मल्याळम भाषेत 3 ट्वीट; काय म्हणाले?

PM Narendra Modi on Thiruvananthapuram Corporation Election : केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मोठं यश मिळवलंय. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत एनडीए सर्वात मोठा पक्ष ठरला असून, तब्बल 45 वर्षांपासूनच्या डाव्यांच्या सत्तेला त्यांनी सुरुंग लावलाय..

हे वाचलं का?

101 प्रभागांच्या तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत एनडीएने 50 जागांवर विजय मिळवला आहे. सत्ताधारी एलडीएफला केवळ 29 जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीला (यूडीएफ) 19 जागा मिळाल्या. दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. एका प्रभागातील उमेदवाराच्या मृत्यूनंतर तेथील मतदान रद्द करण्यात आले होते. या निकालामुळे तिरुवनंतपुरममधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे स्पष्ट झाले असून, महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी एनडीए भक्कम स्थितीत पोहोचली आहे.

हा निकाल राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. कारण तिरुवनंतपुरम जिल्हा हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांचा मतदारसंघ आहे. राज्याच्या राजधानीत भाजपने मिळवलेले हे यश पक्षासाठी ऐतिहासिक मानले जात आहे.

शशि थरुर यांची पहिली प्रतिक्रिया 

या निकालांवर प्रतिक्रिया देताना खासदार शशी थरूर यांनी लोकशाहीच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा असल्याचे म्हटले. जनतेने बदलाचा संदेश दिला असून, कोणत्याही पक्षाच्या बाजूने दिलेला कौल स्वीकारणे हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. तिरुवनंतपुरममधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचेही त्यांनी अभिनंदन केले.

9 आणि 11 डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत झालेल्या या निवडणुकांत राज्यातील एकूण मतदानाची टक्केवारी 73.69 इतकी नोंदवण्यात आली. 2026 मध्ये होणाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल सर्वच पक्षांसाठी दिशा दाखवणारे मानले जात आहेत, विशेषतः शहरी भागांतील भाजपच्या वाढत्या प्रभावाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नरेंद्र मोदींचे मल्याळम भाषेत 3 ट्वीट

नरेंद्र मोदी म्हणाले, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप–एनडीएच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या केरळमधील सर्व जनतेचे मी मनापासून आभार मानतो. यूडीएफ आणि एलडीएफ यांच्या कारभाराला केरळ कंटाळले आहे. चांगले प्रशासन देऊ शकणारा आणि सर्वांसाठी संधी असलेले विकसित केरळ घडवू शकणारा एकमेव पर्याय एनडीए आहे, असा जनतेचा ठाम विश्वास आहे.

धन्यवाद तिरुवनंतपुरम!

तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत भाजप–एनडीएला मिळालेला जनादेश हा केरळच्या राजकारणातील एक निर्णायक आणि ऐतिहासिक क्षण आहे. राज्याच्या विकासाच्या आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता केवळ आमच्या पक्षातच आहे, याबाबत जनतेला पूर्ण खात्री आहे. या ऊर्जावान शहराच्या विकासासाठी तसेच नागरिकांचे ‘जीवनमान अधिक सुलभ’ करण्यासाठी आमचा पक्ष सातत्याने कार्य करेल.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत हे मोठे यश मिळवून देण्यासाठी जनतेमध्ये जाऊन मेहनत करणाऱ्या सर्व भाजप कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आजचा हा निकाल प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तळागाळात काम करणाऱ्या केरळमधील विविध पिढ्यांतील कार्यकर्त्यांच्या कार्याची आणि संघर्षाची आठवण करून देणारा हा दिवस आहे. आमचे कार्यकर्ते हीच आमची खरी ताकद आहे; त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे!

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अमोल मिटकरींची बदनामी केल्याप्रकरणी 4 युट्यूब पत्रकारांना 5 दिवसांचा तुरुंगवास; हक्कभंग प्रस्तावाचा इम्पॅक्ट

    follow whatsapp