सातारा: सातारा जिल्ह्यात नुकत्याच उघडकीस आलेल्या ड्रग्स निर्मिती प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात 7.5 किलो एमडी ड्रग्स, 38 किलो द्रवरूप अमली पदार्थ आणि मोठ्या प्रमाणात कच्चा माल जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत अंदाजे 115 कोटी रुपये एवढी आहे.
ADVERTISEMENT
हे प्रकरण केवळ अंमली पदार्थांच्या उत्पादनापुरते मर्यादित नसून, त्यात राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांचा सहभाग असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये फडणवीस-शिंदे-पवार सरकारवर गंभीर आरोप करत 'उडता महाराष्ट्र' होण्याच्या धोक्याकडे लक्ष वेधले आहे.
या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असून, विरोधक सरकारवर कव्हर-अपचा आरोप करत आहेत. याशिवाय हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांचे नाव घेत नवी खळबळ उडवून दिली आहे.
हे ही वाचा>> धक्कादायक... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावापासून जवळच सापडला 115 कोटींचा ड्रग्स साठा; क्राईम ब्रांचने 'असा' मारला छापा!
सपकाळ यांच्या पोस्टनुसार, हे सरकार 'वोटचोरी' करून सत्तेवर आले असून, आता ड्रग्स प्रकरणातही बनावबनवी करत आहे. ते म्हणतात, "ड्रग्स प्रकरणात देखील बनवाबनवी वोटचोरी करून सत्तेवर बसलेले फडणवीस-शिंदे-पवार सरकार आता 'उडता महाराष्ट्र' करूनच थांबणार आहे का? ड्रग्स निर्मिती करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारने सातारा ड्रग्स प्रकरणात पुढील प्रश्नांची उत्तरे द्यावीत." या पोस्टमध्ये त्यांनी अनेक संवेदनशील प्रश्न उपस्थित केले आहेत.
हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्वीट
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर लगेचच राजकीय वाद सुरू झाला. काँग्रेसने या प्रकरणात एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेत्यांच्या निकटवर्तीयांची नावं घेत काही गंभीर आरोप केले आहेत. सपकाळ यांच्या मते, हे प्रकरण केवळ अंमली पदार्थांच्या उत्पादनापुरते नाही, तर त्यात राजकीय संरक्षण असल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा>> दुर्मिळ शक्तीवर्धक गोळ्या देतो म्हणून 48 लाख उकळले, '420 गुरुजीची पोलखोल, दोघांना अटक
दरम्यान, सरकारकडून अद्याप या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, पोलिस सूत्रांच्या मते, या प्रकरणाची चौकशी सुरू असून, आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणात स्वतंत्र तपासाची मागणी केली आहे, जेणेकरून राजकीय दबावाशिवाय सत्य बाहेर येईल.
राज्यातील ड्रग्स समस्या
महाराष्ट्रात अलीकडच्या काळात ड्रग्स प्रकरणांची संख्या वाढली आहे. सातारा प्रकरण हे त्यातील एक उदाहरण आहे. तज्ज्ञांच्या मते, दुर्गम भागात अशा कारखान्यांचा उघडकीस येणे हे राज्यातील अमली पदार्थांच्या जाळ्याचे गांभीर्य दर्शवते. काँग्रेसने या प्रकरणातून सरकारच्या अपयशाकडे लक्ष वेधले असून, युवकांना ड्रग्सच्या विळख्यातून वाचवण्यासाठी कठोर कायदे आणि पारदर्शक कारवाईची मागणी केली आहे. हे प्रकरण राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने, पुढील काळात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











