भिवंडी हादरलं : अल्पवयीन मुलीला दोरीनं बांधून केला सामूहिक बलात्कार

16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. ही सामूहिक बलात्काराची खळबळजनक घटना भिवंडीतील काल्हेर भागातील आहे. येथे एका 16 वर्षीय मुलीची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलाशी भेट झाली. दीड वर्षापूर्वी तरुणाने इन्स्टाग्रामवर चॅटद्वारे पीडितेशी बोलण्यास सुरुवात केली होती. दोघांनी गेल्या शुक्रवारी भेटण्याचा बेत आखला होता. दोरीने बांधून तिघांनी केलं दुष्कर्म तरुण तरुणीला त्याच्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:08 AM • 30 Aug 2022

follow google news

16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. ही सामूहिक बलात्काराची खळबळजनक घटना भिवंडीतील काल्हेर भागातील आहे. येथे एका 16 वर्षीय मुलीची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलाशी भेट झाली. दीड वर्षापूर्वी तरुणाने इन्स्टाग्रामवर चॅटद्वारे पीडितेशी बोलण्यास सुरुवात केली होती. दोघांनी गेल्या शुक्रवारी भेटण्याचा बेत आखला होता.

हे वाचलं का?

दोरीने बांधून तिघांनी केलं दुष्कर्म

तरुण तरुणीला त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर घेऊन गेला. आताच ती मुलगी त्या मुलाशी बोलत होती तेवढ्यात अजून दोन मुलं तिथे आली. त्यानंतर तिघांनी मिळून मुलीला दोरीने बांधून बेडरुममध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. बलात्काराच्या वेळी विरोध केल्याने मुलीलाही मारहाण करण्यात आली. सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली. घटनेबाबत कोणाला सांगणार नाही, या अटीवर आरोपीने मुलीला सोडून दिले.

पोलिसात गुन्हा दाखल, तिन्ही आरोपी गजाआड

जखमी अवस्थेत घरी पोहचत तिने घरच्यांना झालेली हकीकत सांगितली. हे ऐकून घरच्यांना धक्का बसला. तिला घेऊन कुटुंबीयांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीनंतर नारपोली पोलिसांनी या तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. अटक करण्यात आलेले तिघे ठाण्याच्या वागळे इस्टेट भागातील रहिवासी आहेत.

पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

आरोपी तरुण दीड वर्षापूर्वी पीडित तरुणीला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून भेटला होता. पोलिस या अल्पवयीन मुलीचे समुपदेशन करत आहेत. 164 मध्ये तरुणीचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सामुहिक बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    follow whatsapp