जळगाव : मैत्रिणीने गोड बोलून स्वच्छतागृहात नेलं अन् दोघांकडून सामूहिक बलात्कार

मुंबई तक

29 Sep 2026 (अपडेटेड: 29 Sep 2026, 03:08 PM)

Jalgaon Crime News : चाळीसगाव शहरालगत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून अल्पवयीन मुलीवर कायद्यानुसार कारवाई सुरू आहे.

Jalgaon Crime News

Jalgaon Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

जळगाव : मैत्रिणीने गोड बोलून स्वच्छतागृहात नेलं अन्

point

दबा धरुन बसलेल्या दोघांकडून सामूहिक बलात्कार

Jalgaon Crime News, मनीष जोग : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरालगत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आईसोबत कामासाठी गेली होती. तिची आई पाणी भरण्यासाठी घरी गेल्याची संधी साधून 16 वर्षीय अल्पवयीन मैत्रिणीने पीडितेला महिला स्वच्छतागृहात नेले. त्या ठिकाणी राहुल आणि आर्या हे दोन्ही तरुण आधीच उपस्थित होते. पीडित मुलगी स्वच्छतागृहात येताच राहुल याने तिच्यावर अत्याचार केला.

हे वाचलं का?

हेही वाचा : ठाकरे बंधूंचा निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चा कुठून कुठपर्यंत? राज यांनी सगळचं सांगितलं, सत्ताधाऱ्यांनाही महत्त्वाचं आवाहन

दोन्ही तरुणांकडून आळीपाळीने अत्याचार 

यावेळी पीडित मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र, 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने तिचे तोंड दाबून हात पकडले. त्यानंतर आर्या यानेही पीडितेवर अत्याचार केला. दोन्ही तरुणांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केल्यानंतर राहुल याने पुन्हा तिच्यावर अत्याचार केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : 'ती' फेसबुक पोस्ट अन् श्रुती मराठे विद्याधर जोशींवर चांगलीच भडकली; म्हणाली, "घरात बसून.."

कोणाला सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील अशी धमकी 

अत्याचारानंतर हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आर्या याने पीडितेला दिली. तसेच 16 वर्षीय अल्पवयीन मुलीनेही आपले नाव कोणाला सांगितल्यास पीडितेला सोडणार नसल्याची धमकी दिली. या प्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2)(i), 64(2)(m), 65(1), 70(2), 351(2), 49, 3(5) तसेच POCSO कायद्याच्या कलम 4, 6, 8, 10, 12 आणि 17 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मध्य प्रदेशातील दोन्ही आरोपी तरुणांना तात्काळ अटक केली आहे. तर 16 वर्षीय अल्पवयीन मुलीबाबत कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.