Baramati double murder case, वसंत मोरे : बारामती तालुक्यातील शेरेवाडी गावात दोन वृद्ध महिलांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या अंगणात खाटांवर झोपलेल्या दोन्ही महिलांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेत कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय 63) आणि इंदुमती मारुती लडकत (वय 75) यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या दुहेरी हत्याकांडामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'ती' फेसबुक पोस्ट अन् श्रुती मराठे विद्याधर जोशींवर चांगलीच भडकली; म्हणाली, "घरात बसून.."
अंगणात खाटांवर झोपलेल्या असताना धारदार शस्त्राने हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला एकमेकींच्या चुलत सासू-सुना होत्या. इंदुमती लडकत यांना मधुमेहाचा त्रास असल्याने दोघी एकत्र झोपत होत्या. सोमवारी मध्यरात्री दोघी घराच्या अंगणात खाटांवर झोपलेल्या असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी दोघींचा गळा चिरला. इंदुमती लडकत या बाबुर्डी गावच्या माजी सरपंच होत्या. दोन्ही महिलांच्या हत्येमुळे शेरेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : कॉकरोच जनता पार्टीला शिवाजी पार्कवर आंदोलन करण्याची परवानगी का नाकारली?
घराचा दरवाजा उघडा असल्याचे आढळून आले
घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे आढळून आले. तसेच घरातील कपाटेही उघडी होती. काही दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने दोन्ही महिलांची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून हत्येचा तपास सुरू केला आहे.
या दुहेरी हत्याकांडामागे नेमके कोण आहे आणि हत्येचे कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे शेरेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून हत्येचा नेमका उलगडा करण्यासाठी तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












