दुहेरी हत्याकांडाने बारामती हादरली, दोन महिलांना गळा चिरुन संपवलं

मुंबई तक

29 Sep 2026 (अपडेटेड: 29 Sep 2026, 08:58 AM)

Baramati double murder Case : बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे दोन महिलांची गळा चिरून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत अशी मृत महिलांची नावे असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Baramati double murder Case

Baramati double murder Case

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दुहेरी हत्याकांडाने बारामती हादरली

point

दोन महिलांना गळा चिरुन संपवलं

Baramati double murder Case, वसंत मोरे: बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे मध्यरात्री दोन महिलांची गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत अशी हत्या झालेल्या दोन्ही महिलांची नावे आहेत. या घटनेमुळे शेरेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : गर्भवती नर्तिकेला मृत समजून जंगलात जिवंत जाळले, कलाकेंद्रातील वादाचा भयंकर शेवट!

दोन्ही महिलांची गळा चिरून हत्या

मध्यरात्रीच्या सुमारास ही दुहेरी हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही महिलांची गळा चिरून हत्या करण्यात आली. मात्र, या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून या दुहेरी हत्येचा तपास सुरू करण्यात आला आहे. हत्येमागील कारण काय आहे, तसेच या घटनेत नेमका कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास केला जात आहे.

हेही वाचा : कॉकरोच जनता पार्टीला शिवाजी पार्कवर आंदोलन करण्याची परवानगी का नाकारली?

तपासातून घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता 

परिसरातील माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत यांच्या हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नसल्याने पोलिसांच्या तपासातून या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.