दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: दोनच दिवसांपूर्वी मध्यरात्री कोल्हापूरच्या कागल इथल्या अज्ञात शेतकऱ्यांनी महावितरण अधिकारांचं कार्यालय पेटवलं. तर काल मध्यरात्री कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या दालनात अज्ञात शेतकऱ्यांनी साप सोडल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, हा साप नेमका कोणी सोडला हे अद्याप समोर आलेलं नाही. पण आता या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांना दिवसा सलग बारा तास वीज पुरवठा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचं शस्त्र उपसलं आहे. संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर ताराबाई पार्क इथल्या वीज महावितरण कार्यालयासमोर गेली पाच दिवस राजू शेट्टी यांचे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटविले होते.
यानंतर काल मध्यरात्री जिल्हाधिकारी कार्यालय येथे साप सोडण्यात आला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
शुक्रवारी 25 फेब्रुवारी रोजी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ताराबाई पार्क इथल्या महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनस्थळी जाऊन चर्चा केली.
मोडला नाही कणा…नापिकीला कंटाळून दुग्धव्यवसायाकडे वळलेला शेतकरी कमावतोय लाखोंमध्ये
मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. मंत्री महोदयांकडून हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जोपर्यंत दिवसा बारा तास शेतकऱ्यांना वीज पंपांना वीज पुरवठा केला जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असं राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितलं होतं.
ADVERTISEMENT
