सुट्टीच्या दिवशी आपल्या लहान मुलांना मॉलमध्ये घेऊन जाणं हे अगदीच कॉमन झालं आहे. मात्र मुलांना मॉलमध्ये घेऊन जात असाल तरीही त्यांच्याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. कारण मुंबईतल्या घाटकोपर येथील मॉलमध्ये घसरगुंडी खेळताना एका चिमुकलीचा मृत्यू झाला. किड्स झोन मध्ये ही मुलगी खेळत होती. त्यावेळी तोल जाऊन ती खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
घाटकोपरच्या नीलयोग मॉलमध्ये घडली घटना
मुंबईतल्या घाटकोपर पूर्व भागात नीलयोग नावाचा मॉल आहे. या मॉलमध्ये किड्स झोन आहे. या ठिकाणी घसरगुंडी खेळत असताना दालिशा वर्मा नावाची चिमुकली मुलगी खाली पडली. तिच्या डोक्याला मार लागल्याने ती बेशुद्ध झाली. तिच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने तिला मुलुंडच्या रूग्णालयात आणलं गेलं. मात्र तिथे आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
पोलिसांनी काय माहिती दिली आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षांची दलिशा तिच्या आई वडिलांसोबत घाटकोपरच्या नीलयोग मॉल या ठिकाणी गेली होती. तिथे तिला तिच्या आई वडिलांनी किड्स झोनमध्ये खेळण्यासाठी सोडलं. त्यावेळी घसरगुंडी खेळत असताना दलिशाचा तोल गेला आणि ती खाली पडली. दलिशा डोक्यावर पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच तिथल्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे फोर्टिस रूग्णालयातही हलवण्यात आलं. फोर्टिसच्या डॉक्टरांनी दलिशाला तपासलं पण तोपर्यंत उशीर झाला होता ज्यानंतर दलिशाला मृत घोषित करण्यात आलं.
ADVERTISEMENT
