मुख्यमंत्री शिंदेंच्या वॉर्निंगनंतर सत्तार यांचे मौन : राजकीय प्रश्न विचारताच तोंडावर बोट

मुंबई तक

• 10:27 AM • 10 Nov 2022

औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधातील वक्तव्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच वादात सापडले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचे कान टोचत त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता. तसंच त्यांनी सत्तार यांना सुळेंची जाहीरपणे माफी मागण्याचेही आदेश दिले होते. मुख्यमंत्री शिंदेंच्या या वॉर्निंगनंतर आता मात्र सत्तार यांनी राजकीय प्रश्नांवर मौन बाळगण्याची भूमिका घेतली […]

Mumbaitak
follow google news

औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधातील वक्तव्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच वादात सापडले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचे कान टोचत त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता. तसंच त्यांनी सत्तार यांना सुळेंची जाहीरपणे माफी मागण्याचेही आदेश दिले होते.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री शिंदेंच्या या वॉर्निंगनंतर आता मात्र सत्तार यांनी राजकीय प्रश्नांवर मौन बाळगण्याची भूमिका घेतली आहे. आज औरंगाबाद विभागीय कार्यालयात मराठवाड्यातील पीक नुकसान आढावा बैठक पार पडली. यानंतर अब्दुल सत्तार यांनी अधिकचे राजकीय भाष्य करण्यास नकार दिला. तसंच आज मला काहीही राजकीय प्रश्न विचारू नका, अशी विनंती पत्रकारांना केली.

त्यानंतरही पत्रकारांनी अधिकच हट्ट धरल्याने सत्तार यांनी राऊत यांच्या जामीनाबाबत मात्र भाष्य केलं. ते म्हणाले, राऊत यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण ते वाघ आहे की नाही हे मला माहित नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा असं सांगत मी अधिकच बोललो तर तुम्ही मला अडकवाल अशी आठवण करून द्यायलाही सत्तार विसरले नाहीत.

अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंबद्दल काय म्हणाले?

‘सुप्रिया सुळे म्हणताहेत की, ५० खोके तुम्हालाही मिळालेत का? त्यावर तुम्ही (अब्दुल सत्तार) त्यांना म्हणता का तुम्हाला द्यायचेत का? तर त्यावर त्या (सुप्रिया सुळे) म्हणताहेत की, तुमच्याकडे आले असतील म्हणूनच तुम्ही त्यांना ऑफर करताहेत… काय सांगाल?’, असा प्रश्न ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अब्दुल सत्तार यांना विचारला. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, ‘इतकी भिकार#$ झाली असेल, सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’, असं उत्तर सत्तारांनी दिलं.

सत्तारांकडून फक्त दिलगिरी :

सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्यात त्यांनी कुठेही सुप्रिया सुळेंचं नाव घेतलेलं नाही. जे आम्हाला बदनाम करतायत त्यांच्याबद्दल मी बोललो. मी कोणत्याही महिलेबद्दल बोललो नाही. मी महिलांचा सन्मान करतो. पण कुठल्या महिलेचं मन दुखलं असेल तर मी खेद व्यक्त करतो. मी माझे शब्द मागे घेतो. कुठल्या महिलेचं मन दुखलं असेल तर मी सॉरी बोलतो, असं त्यांनी म्हटलं आहे. 

    follow whatsapp