कोरोनाचे नियम तोडल्याप्रकरणी अभिनेत्री गौहर खानवर गुन्हा दाखल

टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान हिच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गौहर खानवर ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौहरला कोरोनाची बाधा झाली असताना देखील ती सार्वजिनक परिसरात वावरत होती. यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. View this post on Instagram A post […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:17 AM • 15 Mar 2021

follow google news

टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान हिच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गौहर खानवर ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौहरला कोरोनाची बाधा झाली असताना देखील ती सार्वजिनक परिसरात वावरत होती. यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांद्वारे यासंदर्भात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २६९, २७० आणि साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलम २ व ३ नुसार गुन्हा दाखल केलाय.

पोलीस तक्रारीमध्ये नमूद केल्यानुसार, गौहर हिची यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर घरातच विलगीकरण पद्धतीने राहणं बंधनकारक असताना देखील नियमांचं उल्लंघन करून गौहरने सार्वजनिक परिसरातील वावर सुरू ठेवला होता.

    follow whatsapp