Bhushan Desai : ‘मुलाचं शिवसेनेत कोणतचं काम नाही…’, सुभाष देसाई प्रचंड दुखावले

मुंबई तक

13 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:38 PM)

मुंबई : शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या कुटुंबातच फूट पडली आहे. देसाई यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आज (सोमवारी) शिवसेनेत प्रवेश केला. (Senior leader Subhash Desai’s son Bhushan Subhash Desai […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या कुटुंबातच फूट पडली आहे. देसाई यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आज (सोमवारी) शिवसेनेत प्रवेश केला. (Senior leader Subhash Desai’s son Bhushan Subhash Desai join Shiv Sena party)

हे वाचलं का?

सुभाष देसाई प्रचंड दुखावले :

दरम्यान, मुलाने ठाकरेंची साथ सोडल्यानंतर वडील सुभाष देसाई प्रचंड दुखावले. ते म्हणाले, माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. पण त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कोणत्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही.

शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत आणि शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे, असंही सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं.

Bhushan Desai : “सुभाष देसाईंना स्पष्टपणे सांगून निघालोय, मी शिंदेंसोबत…”

सुभाष देसाई ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय :

सुभाष देसाई यांच्या मुलानेच ठाकरेंची साथ सोडल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. सुभाष देसाई शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंसोबत होते. त्यानंतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याही जवळच्या गोटातील नेते मानले जाऊ लागले. पक्षसंघटनेतील काही मोजक्या जुन्या नेत्यांच्या यादीत सुभाष देसाई यांचं नावं अग्रक्रमाने घेतलं जातं. २००५ मध्ये त्यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाली होती.

ठाकरेंना जबर धक्का : सुभाष देसाईंच्या कुटुंबातच फूट; पुत्र एकनाथ शिंदेंसोबत!

सुभाष देसाई यांची संसदीय कारकिर्द १९९० साली सुरु झाली. १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर २००४ आणि २००९ साली ते पुन्हा विधानसभेवर निवडून गेले. २००९ ते २०१४ या काळात देसाई यांच्यावर शिवसेनेच्या विधिमंडळनेतेपदाचीही धुरा सोपविण्यात आली होती. पुढे देसाई यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. या दरम्यान त्यांच्याकडे राज्याचे उद्योग मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्येही ठाकरेंच्या मंत्रिमंडळात देसाई यांची निवड झाली होती.

    follow whatsapp