सोनिया गांधींपाठोपाठ प्रियंका गांधीही कोरोना पॉझिटिव्ह, पोस्ट करत दिली माहिती

मुंबई तक

• 06:28 AM • 03 Jun 2022

देशात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढते आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात होती. अशात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना झाल्याची बातमी समोर आली होती. त्यापाठोपाठ आता प्रियंका गांधी यांनाही कोरोना झाला आहे. प्रियंका गांधी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. I've tested positive for COVID-19 with mild symptoms. Following all the protocols, I […]

Mumbaitak
follow google news

देशात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढते आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात होती. अशात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना झाल्याची बातमी समोर आली होती. त्यापाठोपाठ आता प्रियंका गांधी यांनाही कोरोना झाला आहे. प्रियंका गांधी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे प्रियंका गांधी यांनी?

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. मी सगळी काळजी घेत स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. जे कुणीही माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. तसंच कोरोना चाचणीही करून घ्यावी असं आवाहन प्रियंका गांधी यांनी केलं आहे.

कांग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची चाचणी कालच पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांनीही स्वतःला आयसोलेट केलं होतं. त्यांना कोरोना झाल्याचं कळताच प्रियंका गांधी यांनी त्यांचा लखनऊ दौरा रद्द केला आणि त्या दिल्लीत परतल्या होत्या. आज त्यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

महासचिव पदाची जबाबदारी असलेल्या प्रियंका गांधी या लखनऊ या ठिकाणी काँग्रेसच्या नवसंकल्प शिबीरात सहभागी झाल्या होत्या. लखनऊतून दिल्लीला त्या परतल्या कारण सोनिया गांधी यांनी कोरोना झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. आता आज प्रियंका गांधी या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.

सोनिया गांधी गेल्या काही दिवसात ज्या नेत्यांना भेटल्या होत्या त्यातले काही नेते कोरोना पॉझिटिव्ह आले होते असं रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं होतं. सुरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांना गुरूवारी सौम्य स्वरूपाचा ताप आला होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती त्या पाठोपाठ आज प्रियंका गांधी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोनिया गांधी यांना लवकर बरं वाटावं म्हणून मी प्रार्थना करतो या आशयाचं ट्विट केलं होतं. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी मनी लाँड्रींग प्रकरणात चौकशीची नोटीस धाडली आहे. ८ जून रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. सोनिया गांधी पॉझिटिव्ह आल्याने त्या तपासासाठी उपस्थित राहणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

    follow whatsapp