अनुराग गुप्ता, प्रतिनिधी
ADVERTISEMENT
अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शाहरुख खानने त्याचं शुटिंगही रद्द केलं आहे. आर्यन खानला या प्रकरणात 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये ड्रग्ज पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सहभागी होण्यासाठी आर्यन खानही गेला होता त्याचवेळी NCB ने त्याच्यासह एकूण बारा जणांना अटक केली आहे.
यानंतर अर्थातच शाहरुख खानला वाईट वाटलं असणार यात काहीही शंका नाही. आता शाहरुख खानला धीर देण्यासाठी त्याचे फॅन्स मन्नतच्या बाहेर जमा झाले आहेत. या खेपेला ते हसून शाहरुखचं स्वागत करत नाहीत. तर शाहरुख ज्या कठीण प्रसंगातून जातो आहे त्यासाठी त्याला धीर देण्यासाठी आले आहेत.
बांद्रा या ठिकाणी शाहरुख खानचं मन्नत हे घर आहे. त्या घराच्या समोर फॅन्स जमा झाले आहेत. मुंबई तकशी बोलताना त्यांनी हे सांगितलं की यावेळी आम्ही आमच्या लाडक्या शाहरुखला धीर देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. आम्ही त्याला आमच्या कुटुंबातला सदस्यच मानतो. जेव्हा त्याचा सिनेमा हिट होतो तेव्हा आम्ही आनंदाने त्याच्या घरासमोर जमतो. आज आमचा लाडका शाहरुख त्याच्या मुलाला अटक झाल्याने दुःखात आहे त्यामुळे आम्ही त्याचा धीर वाढवण्यासाठी त्याच्या घराबाहेर जमलो आहोत. आपल्या कुटुंबाच्या सुख दुःखात आपण जसे एकमेकांसोबत उभे राहतो अगदी त्याच भावनेतून आम्ही इथे आलो आहोत असंही त्याच्या चाहत्या वर्गाने सांगितलं. अनेकांच्या हातात Take Care Shahrukh असे बोर्डही होते.
आर्यन खान हा ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे. त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. आता त्याचं काय होणार हा प्रश्नही शाहरुखच्या चाहत्यांना पडला आहे.
‘जगाच्या कानाकोपऱ्यातील आम्ही सर्व चाहते तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. या कठीण काळात आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत, काळजी घे किंग’, असा संदेश लिहिलेला बॅनर हातात घेऊन चाहते मन्नतबाहेर उभे आहेत. याआधी सलमान खान, अलविरा खान, सीमा खान, महीप कपूर आणि इतर सेलिब्रिटींनी मन्नत बंगल्यावर येऊन शाहरुख आणि गौरीची भेट घेतली. इंडस्ट्रीतील बरेच कलाकार शाहरुखच्या बाजूने असल्याचंही म्हटलं जात आहे. शाहरुखचे सहकलाकार राणी मुखर्जी, काजोल, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा यांनीसुद्धा फोन करून त्याची विचारपूस केली.
ADVERTISEMENT
