मेट्रो-३ प्रकल्पाबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे आज (12 फेब्रुवारी) सहार रोड ते डोमॅस्टिक विमानतळ हा १.५ किमी इतका लांब ३६वा भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. तापी-१ आणि तापी-२ या दोन टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) च्या मदतीने पॅकेज-६ ने एकूण ४.४ किमीचे भुयारीकरण पूर्ण केले आहे. आज पॅकेज-६ मधील भुयारीकरण शंभर टक्के पूर्ण करून आणखी एक महत्त्वाचा टप्पा […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:01 PM • 12 Feb 2021

follow google news

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे आज (12 फेब्रुवारी) सहार रोड ते डोमॅस्टिक विमानतळ हा १.५ किमी इतका लांब ३६वा भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. तापी-१ आणि तापी-२ या दोन टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) च्या मदतीने पॅकेज-६ ने एकूण ४.४ किमीचे भुयारीकरण पूर्ण केले आहे.

हे वाचलं का?

आज पॅकेज-६ मधील भुयारीकरण शंभर टक्के पूर्ण करून आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या पॅकेजमधील दोन स्थानके डोमॅस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळ टर्मिनलवर आहेत. या दोन्ही स्थानकांना एअरपोर्ट टर्मिनलशी जोडले जाणार आहे. त्यामुळे विमानतळापर्यंत प्रवास करणे प्रवाश्यांना अधिक सोयिस्कर होणार आहे.

हार्ड रॉक तंत्रज्ञानाने सुसज्ज टेराटॅक निर्मित टीबीएम तापी -१ आणि २ द्वारे १५ महिन्यात भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे. डोमॅस्टिक विमानतळ स्थानकाचे जवळपास ७६.४ टक्के बांधकाम पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Budget 2021-महाराष्ट्राला गिफ्ट, नाशिक मेट्रोची घोषणा

पॅकेज-६ अंतर्गत डोमॅस्टिक विमानतळ, इंटरनॅशनल विमानतळ आणि सहार रोड मेट्रो स्थानकांचा समावेश असून या पॅकेजमध्ये ४ भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. इंटरनॅशनल विमानतळ ते सहार रोड आणि सहार रोड ते डोमॅस्टिक विमानतळ असं हे भुयारीकरण करण्यात आलं आहे.

मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ५०.३ किमी म्हणजे जवळजवळ ९३ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे. मात्र असं असलं तरीही मेट्रो कार शेड नेमकं कुठे उभारण्यात येणार याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. त्यामुळे हे कारशेड उभारल्यानंतरच मेट्रो-३ हा सर्वात मोठा प्रकल्प पूर्णपणे मार्गी लागू शकतो. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. त्यानंतर कारशेडला पर्यायी म्हणून कांजूरमार्गमधील जमिन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण या जमिनीवरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात बराच वाद निर्माण झाला. त्यामुळे सध्या तरी मेट्रो कारशेडचा विषय हा अंधातरिच असल्याचे दिसतं आहे.

    follow whatsapp