ADVERTISEMENT
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (19 फेब्रुवारी) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. खरं तर कोल्हापूर ही अमित शाह यांची सासरवाडी आहे.
अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
कोल्हापूर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अमित शाह यांचा दौरा पार पडला. दिल्लीहून पोलिसांचे विशेष पथकही कोल्हापुरात यावेळी होते.
यावेळी भाजपकडून लोकसभेची रणनीती ठरवण्यात आली असल्याचं म्हटलं जातंय.
तसंच, दौऱ्यावर असताना शाह दाम्पत्याने कोल्हापूरच्या मंदिरात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं.
याठिकाणी अमित शाह आणि त्यांच्या पत्नी सौ. सोनल शाह यांनी करवीरनिवासिनी अंबाबाईची ओटीही भरली.
अमित शाह आणि त्यांच्या पत्नीने देवीची आराधना करत तिला शालू अर्पण केला.
देवस्थान समितीतर्फे शाह यांना देवीची चांदीची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली आहे.
मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील हे अमित शाहांचे निकटवर्तीय समजले जातात. ते देखील या दौऱ्यात शाहा यांच्यासोबतच होते.
ADVERTISEMENT
