Crime News : प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या वहिनी आणि निष्पाप पुतणीची एका 25 वर्षीय तरुणीने हत्या केली आहे. सोमवारी रात्री तिने जेवणात गुंगीच्या गोळ्या मिसळून कुटुंबाला बेशुद्ध केले. यानंतर 4 वर्षांच्या चिमुरडीला पाण्याच्या टाकीत फेकले; तर वहिनीच्या पोटावर चाकूने वार करत हत्या केली. आना असं या तरुणीचं नाव आहे. तिने आपल्याच कुटुंबातील सदस्यांना संपवल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर परिसरातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : भिगवण : लग्न चार दिवसांवर असताना तरुणीचं अपहरण, आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून पळवून नेलं
चिमुरडीला पाण्याच्या टाकीत फेकले
आरोपी आनाचे गावातीलच आदिल नावाच्या तरुणाशी गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबाचा या नात्याला विरोध होता, मात्र आना चोरुन त्याला भेटत असे. तिची वहिनी फिरदौस तिला यावरून सतत रागवायची. याला कंटाळून आनाने वहिनीचा काटा काढण्याचे ठरवले. सोमवारी रात्री तिने जेवणात गुंगीच्या गोळ्या मिसळून संपूर्ण कुटुंबाला बेशुद्ध केले. त्यानंतर झोपेत असलेल्या 4 वर्षांच्या चिमुरड्या पुतणीला उचलून गच्चीवरील पाण्याच्या टाकीत फेकून दिले, ज्यामध्ये गुदमरुन तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दिशाभूल करण्याचा प्रयत्न
पुतणीला संपवल्यानंतर आनाने आपली वहिनी फिरदौस हिच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वहिनीला मृत समजून तिने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. घरामध्ये गोंधळ निर्माण झाल्यावर स्वतःचा बचाव करण्यासाठी आनाने बनाव रचला. घरात लुटारु शिरले असून त्यांनीच हा हल्ला केल्याचा आरडाओरडा करून तिने पोलीस आणि शेजाऱ्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा : 10 वीच्या मुलीची मैत्रिणींकडून फसवणूक, भावाकडून बलात्कार घडवून आणला अन् व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल...
तीन तासात गुन्ह्याचा छडा
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत आनाच्या जबाबातील विसंगतीमुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी पाण्याच्या टाकीतून चिमुरडीचा मृतदेह बाहेर काढून वहिनीला रुग्णालयात दाखल केले आहे. अवघ्या तीन तासांत या गुन्ह्याचा छडा लावून पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली असून हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केले आहे.
ADVERTISEMENT











