अमिताभ बच्चन यांना केबीसीत अश्रू अनावर, आयुष्याचे रहस्य उलगडत म्हणाले, कधीच विसरणार नाही

बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हे टीव्ही जगतातील देखील शहंशाह आहेत. कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर अमिताभ बच्चन आपल्या खास शैलीने स्पर्धकांसह चाहत्यांचे मनोरंजन करतात. आता अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या स्पेशल एपिसोडमध्ये अभिषेक बच्चन आणि जया बच्चन केबीसीच्या स्टेजवर पोहोचणार आहेत. अमिताभ यांनी उलगडले आयुष्याचे रहस्य 11 ऑक्टोबरला अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. अशा परिस्थितीत बिग बींच्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:32 AM • 10 Oct 2022

follow google news

बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हे टीव्ही जगतातील देखील शहंशाह आहेत. कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर अमिताभ बच्चन आपल्या खास शैलीने स्पर्धकांसह चाहत्यांचे मनोरंजन करतात. आता अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या स्पेशल एपिसोडमध्ये अभिषेक बच्चन आणि जया बच्चन केबीसीच्या स्टेजवर पोहोचणार आहेत.

हे वाचलं का?

अमिताभ यांनी उलगडले आयुष्याचे रहस्य

11 ऑक्टोबरला अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. अशा परिस्थितीत बिग बींच्या पत्नी जया बच्चन आणि लाडका मुलगा अभिषेक बच्चन केबीसीच्या सेटवर पोहोचून अमिताभ यांना खास सरप्राईज देणार आहेत. अमिताभ यांच्या बर्थडे स्पेशल एपिसोडचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. शोमध्ये अमिताभ बच्चन त्यांच्या आयुष्यातील काही खास क्षणांची पुनरावृत्ती करताना दिसणार आहेत, जे तुम्हाला नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळतील.

पत्नी जया बच्चननी विचारले प्रश्न

आतापर्यंत अमिताभ बच्चन स्पर्धकांना फक्त प्रश्न विचारताना दिसले आहेत. पण आता शोच्या आगामी एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत हॉट सीटवर बसलेले दिसणार आहेत आणि मेगास्टारची पत्नी जया बच्चन प्रश्न विचारणार आहेत.

जया बच्चन अमिताभ यांना प्रश्न विचारतात, जर टाइम मशीन असेल तर कोणत्या वर्षी परत जायला आवडेल आणि का? या प्रश्नावर अमिताभ बच्चन म्हणतात , मला जायला आवडेल…. अमिताभ इतकं बोलतात की मग एक ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ सुरू होतो. व्हिडिओमध्ये त्यांच्या घराची झलक दाखवण्यात आली आहे. ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ पाहून असे वाटते की अमिताभ बच्चन आपल्या पालकांशी संबंधित काही रहस्य उघड करतील.

अमिताभना अश्रू अनावर

यावर बोलताना अमिताभही खूप भावूक होतात. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. व्हिडिओच्या व्हॉईस ओव्हरमध्ये असे म्हटले आहे की, अमितजींनी काय सांगितले ते अद्याप कोणालाही माहित नाही. मात्र, आता अमिताभ बच्चन त्यांच्या आयुष्यातील कोणते रहस्य उघड करणार आहेत, हे शो टेलिकास्ट झाल्यानंतरच कळेल.

जया बच्चन यांनी अमिताभ यांना खास सरप्राईज दिले

कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर जया बच्चन यांनीही अमिताभ बच्चन यांना खास सरप्राईज दिले. जया बच्चन अनेक संगीतकारांसह शोमध्ये पोहोचल्या. KBC च्या मंचावर तुम्हाला आगामी भागात एक संगीतमय कार्यक्रम देखील पाहायला मिळणार आहे. पत्नीचे हे सरप्राईज पाहून अमिताभ बच्चन खूप भावूक होतात. ते म्हणतात, माझ्याकडे शब्द नाहीत, आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही.

    follow whatsapp