BMC Election Result LIVE: मुंबईत कोणाचा झेंडा फडकणार, पाहा निकालाचे प्रत्येक LIVE अपडेट

BMC Election Result LIVE Update: मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 निकालाचे लाइव्ह अपडेट्स आणि प्रत्येक वॉर्डनुसार निकाल पाहता येईल.

bmc election result live whose flag will fly in mumbai see every live update of results bmc election 2026 shiv sena bjp shiv sena ubt mns congress

BMC Election Result LIVE

मुंबई तक

16 Jan 2026 (अपडेटेड: 16 Jan 2026, 09:05 AM)

follow google news

मुंबई: मुंबई महानगरपालिकेसाठी काल (15 जानेवारी) मतदान पार पडले. मुंबई महानगरपालिका (BMC) च्या 227 जागांसाठी सुमारे 1700 उमेदवार रिंगणात होते. याच निवडणुकीचा निकाल आज (16 जानेवारी) जाहीर होणार आहे. ज्याची मतमोजणी ही सकाळी 10 वाजेपासून सुरू होईल. त्यामुळे निकालांचे कल आणि नेमका निकाल पुढील 2 ते 3 तासात स्पष्ट होईल. याच निकालाचे सर्व अपडेट आपल्याला मुंबई Tak वर पाहता येईल.

हे वाचलं का?

मुंबई महापालिका निकाल: क्षणाक्षणाचे अपडेट LIVE 

  • 52.94 टक्के मतदान

          मुंबई महानगरपालिकेत एकूण 52.94 टक्के मतदान झालं असून लवकरच मुंबईत कोणाची सत्ता असणार? हे स्पष्ट होणार आहे. 
 

  • मुंबई महापालिका निवडणूक मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार

मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल्स समोर आले असून, बहुतेक एक्झिट पोलमध्ये BJP-नेतृत्वाखालील महायुती (शिंदे गट शिवसेना + BJP + इतर) ला स्पष्ट बहुमत दाखवले जात आहे.

प्रमुख एक्झिट पोल अंदाज (BMC साठी):

  • Axis My India: महायुतीला 131-151 जागा, उद्धव-राज ठाकरे आघाडीला 58-68 जागा.
  • JVC/Saam TV: महायुतीला 138+ जागा, ठाकरे आघाडीला 59 जागांच्या आसपास.
  • इतर (Sakal, Janmatpolls): महायुतीला 119-140+ जागा, ठाकरे गटाला 75 पर्यंत जागा.

एक्झिट पोलनुसार महायुतीला महिल आणि तरुण मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला असून, ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp