Mumbai Mahanagar Palika Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान शुक्रवारी संध्याकाळी राजकीय चित्र अचानक बदलताना दिसले. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होताच भाजप आणि एकनाथ शिंदे गटाने सुरुवातीच्या फेऱ्यांत आघाडी घेतली होती. त्यामुळे ठाकरे बंधूंचे संख्याबळ 70 जागांच्या आतच मर्यादित राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. दुपारपर्यंत भाजप 100 च्या पुढे मजल मारेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, मतमोजणी संथपणे सुरु असताना संध्याकाळपर्यंत संपूर्ण समीकरणच उलटले. भाजपची घोडदौड थांबली आणि 100 च्या जवळ पोहोचलेली संख्या घसरून थेट 84 वर आली, तर ठाकरे गटाने जोरदार पुनरागमन करत 57 वरून 63 जागांपर्यंत झेप घेतली.
ADVERTISEMENT
संध्याकाळी 8 वाजेपर्यंतची अधिकृत आकडेवारी
BJP: 84
UBT: 63
Shivsena: 26
Congress: 23
AIMIM: 8
MNS : 6
SP : 2
NCP SP : 1
NCP AP : 2
हेही वाचा : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालना महापालिका निवडणुकीत विजयी
मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये अजूनही मतमोजणी सुरू असल्याने निकालांचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंनी अजूनही आशा सोडलेली नसल्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांनी विजयाचे दावे करण्यास सुरुवात केली असली, तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अद्याप मौन बाळगून आहेत. येत्या काही तासांत मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांमध्ये आणखी उलथापालथ होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप 84, शिंदे गट 26, ठाकरे गट 63, मनसे 6, शरद पवार गट 1, काँग्रेस 23 जागांवर आघाडीवर आहेत. मुंबई महानगरपालिकेत बहुमतासाठी 114 जागांची गरज आहे. पुढील फेऱ्यांमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे संख्याबळ कमी होऊन ठाकरे गट वाढला, तर मुंबईत सत्तास्थापनेच्या दृष्टीने चुरशीची राजकीय खेळी रंगण्याची शक्यता आहे. विशेषतः ठाकरे बंधूंनी काँग्रेस आणि वंचितशी हातमिळवणी केल्यास मुंबईच्या राजकारणात नाट्यमय वळण येऊ शकते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











