Mumbai Mahapalika Election Result : मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी गुरुवारी (दि.15) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, आज (दि.16) सकाळी 10 वाजल्यापासून मुंबई महापालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झालीये. मात्र, अजूनही ही मतमोजणी अतिशय संथ गतीने सुरु असल्याचं समोर आलंय. अजूनही या निवडणुकीचा अंतिम निकाल समोर आला नसल्याचं चित्र आहे. दरम्यान, 4.30 वाजेपर्यंत कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या? याबाबतची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. सकाळपासून कोण आघाडीवर आहे? याबाबत चर्चा सुरु होती. मात्र, अधिकृतरित्या कोणी किती जागा जिंकल्या? जाणून घेऊयात.. अंधेरी पश्चिममध्ये मतमोजणीला उशीर झाल्यामुळे मतमोजणी प्रक्रिया आणखी संथ झालेली आहे.
ADVERTISEMENT
4.30 वाजेपर्यंत कोणी किती जागा जिंकल्या?
भाजप - 56
शिवसेना शिंदे गट - 22
शिवसेना उद्धव ठाकरे -44
काँग्रेस 16
एआयएमआय - 6
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 4
ऱाष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 2
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 2
मुंबई महापालिकेच्या सर्व जागांवरील निकाल लागण्यासाठी आणखी 4 ते 5 तास लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अद्याप कोणीही निर्णायक आघाडी मिळवलेली नाही. शिवाय, ठाकरे बंधू आणि महायुतीमध्ये काटे की टक्कर होत असल्याचं चित्र समोर आलं आहे.
दुसरीकडे भाजप नेत्यांनी विजयी सेलिब्रेशन सुरु केल्याचं चित्र पाहायला मिळालंय. मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना डिवचलेलं पाहायला मिळालंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालना महापालिका निवडणुकीत विजयी
ADVERTISEMENT











