मुंबई महापालिका : आत्तापर्यंत मनसेच्या विजयी झालेल्या उमेदवारांची यादी, एका क्लिकवर

Mumbai Mahanagar Palika Election 2026 Result : दुपारी चार वाजेपर्यंत समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार भाजप 56 जागांवर विजयी झालीये. उद्धव ठाकरे गटाने (UBT) 44 जागा जिंकल्या असून शिंदे गटाने (शिवसेना) 22 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेसने 16 जागा मिळवल्या आहेत. याशिवाय AIMIM 6, मनसे 4, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि समाजवादी पक्ष 2 जागांवर विजयी ठरले आहेत. ही आकडेवारी तात्पुरती असून उर्वरित जागांवरील निकालानंतर चित्र बदलण्याची शक्यता कायम आहे.

raj thackeray

raj thackeray

मुंबई तक

16 Jan 2026 (अपडेटेड: 16 Jan 2026, 06:23 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मनसेच्या विजयी झालेल्या उमेदवारांची यादी

point

आत्तापर्यंत काय घडलं?

Mumbai Mahanagar Palika Election 2026 Result : मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज (दि.16) सकाळी सुरुवात झाली असून, दुपारी चार वाजेपर्यंतचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. मात्र, अद्याप अनेक वॉर्डांतील मतमोजणी बाकी असल्याने अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत विविध पक्षांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. विशेषतः मनसेने (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) या निवडणुकीत काही महत्त्वाच्या वॉर्डांमध्ये विजयश्री खेचून आणलीये. 

हे वाचलं का?

दुपारी चार वाजेपर्यंत समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार भाजप 56 जागांवर विजयी झालीये. उद्धव ठाकरे गटाने (UBT) 44 जागा जिंकल्या असून शिंदे गटाने (शिवसेना) 22 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेसने 16 जागा मिळवल्या आहेत. याशिवाय AIMIM 6, मनसे 4, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि समाजवादी पक्ष 2 जागांवर विजयी ठरले आहेत. ही आकडेवारी तात्पुरती असून उर्वरित जागांवरील निकालानंतर चित्र बदलण्याची शक्यता कायम आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीत मनसेच्या कामगिरीकडे विशेष लक्ष वेधलं जात आहे. मनसेने आतापर्यंत मुंबईत सहा उमेदवार विजयी झाल्याचा दावा केला असून, काही प्रभागांमध्ये मनसेच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. स्थानिक प्रश्न, मराठी मुद्दा आणि थेट संपर्क या जोरावर मनसेच्या उमेदवारांनी मतदारांचा विश्वास संपादन केल्याचं पाहायला मिळत आहे.

आतापर्यंत मुंबईत मनसेचे सहा उमेदवार विजयी...

 प्रभाग  क्रमांक 38 मनसेच्या सुरेखा परब विजयी...

प्रभाग क्रमांक 74 मधून विद्या आर्या मनसेच्या उमेदवार विजयी...

प्रभाग क्रमांक 128 मनसेच्या सई शिर्के विजयी...

प्रभाग क्रमांक २०५ मधून मनसेच्या सुप्रिया दळवी विजयी

115 मधून मनसे ज्योती राजभोज विजयी...

प्रभाग क्रमांक 110 मनसे उमेदवार हरी नाक्षी चिराथ विजयी...

हेही वाचा : BMC Ward-wise Results LIVE: पाहा तुमच्या वॉर्डमध्ये कोण आलं निवडून, मुंबई महापालिकेतील वॉडनुसार निकाल!

आतापर्यंत जाहीर झालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 38 मधून मनसेच्या सुरेखा परब विजयी ठरल्या आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 74 मधून विद्या आर्या यांनी मनसेकडून विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 128 मधून सई शिर्के, तर प्रभाग क्रमांक 205 मधून सुप्रिया दळवी यांनी मनसेसाठी यश संपादन केलं आहे. याशिवाय प्रभाग क्रमांक 115 मधून ज्योती राजभोज आणि प्रभाग क्रमांक 110 मधून हरी नाक्षी चिराथ हे मनसेचे उमेदवार विजयी ठरले आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते, मनसेने मर्यादित जागांवर लढत दिली असली तरी ज्या ठिकाणी उमेदवार उभे केले, तेथे संघटनात्मक ताकद आणि स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्याचा फायदा झाल्याचं दिसून येत आहे. काही वॉर्डांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत मनसेच्या उमेदवारांनी बाजी मारल्यामुळे आगामी राजकीय समीकरणांमध्ये मनसेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. एकूणच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निकाल अजून पूर्णपणे स्पष्ट नसला, तरी मनसेने मिळवलेल्या विजयामुळे पक्षासाठी दिलासादायक चित्र उभं राहिलं आहे. उर्वरित मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम आकडेवारी समोर येईल, मात्र आतापर्यंतच्या निकालांवरून मुंबईच्या राजकारणात पुढील काळात नवी गणितं मांडली जाण्याची चिन्हं स्पष्टपणे दिसत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालना महापालिका निवडणुकीत विजयी

    follow whatsapp