मुंबई महापालिकेच्या टफ फाईट होणार? 60 ते 70 जागांवर अजूनही मतमोजणी बाकी, आत्तापर्यंतचं चित्र काय?

Mumbai Mahapalika Election 2026 Result : संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार भाजप सर्वाधिक 56 जागांवर आघाडीवर किंवा विजयी ठरलेला दिसत आहे. त्याखालोखाल उद्धव ठाकरे गट (UBT) 44 जागांवर आघाडीवर आहे. शिंदे गटाची शिवसेना 22 जागांवर, तर काँग्रेसने 16 जागांवर आघाडी मिळवली आहे.

Mumbai Mahapalika Election 2026

Mumbai Mahapalika Election 2026

मुंबई तक

16 Jan 2026 (अपडेटेड: 16 Jan 2026, 06:03 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई महापालिकेच्या टफ फाईट होणार?

point

60 ते 70 जागांवर अजूनही मतमोजणी बाकी, आत्तापर्यंतचं चित्र काय?

Mumbai Mahapalika Election 2026 Result : मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी गुरुवारी (दि.15) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज शुक्रवारी (दि.16) सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मात्र दिवसभर उलटूनही मतमोजणीची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा संथ गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अद्याप मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल जाहीर झालेला नाही आणि सत्तासंघर्ष अधिकच रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे वाचलं का?

संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार भाजप सर्वाधिक 56 जागांवर आघाडीवर किंवा विजयी ठरलेला दिसत आहे. त्याखालोखाल उद्धव ठाकरे गट (UBT) 44 जागांवर आघाडीवर आहे. शिंदे गटाची शिवसेना 22 जागांवर, तर काँग्रेसने 16 जागांवर आघाडी मिळवली आहे. याशिवाय AIMIM ने 6, मनसेने 4, राष्ट्रवादी काँग्रेसने 2 आणि समाजवादी पक्षाने 2 जागांवर यश मिळवलं आहे. मात्र ही आकडेवारी अंतिम नसून, अजूनही तब्बल 60 ते 70 जागांवरील मतमोजणी प्रलंबित असल्याने चित्र कधीही बदलू शकतं.

हेही वाचा : Maharashtra Civic Poll Results LIVE: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेचा निकाल एकाच ठिकाणी, पाहा LIVE

सकाळपासूनच कोणत्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. सध्याच्या आकडेवारीनुसार कोणत्याही एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे निकालानंतर संभाव्य युती, आघाड्या आणि सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. विशेषतः काही महत्त्वाच्या वॉर्डांमध्ये मतांमधील फरक अत्यंत कमी असल्याने शेवटच्या फेऱ्यांमध्ये निकाल पलटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मुंबईच्या काही भागांमध्ये मतमोजणी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय कारणांमुळे विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे. अंधेरी पश्चिम परिसरात मतमोजणी उशिरा सुरू झाल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला. निवडणूक अधिकाऱ्यांकडून मात्र प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू असून लवकरच अंतिम निकाल जाहीर केला जाईल, असा दावा करण्यात येत आहे. एकंदरीतच मुंबई महापालिकेचा निकाल अजूनही गुलदस्त्यात असल्याने राजकीय वातावरणात प्रचंड उत्सुकता आहे. उर्वरित जागांवरील मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच सत्तेचं नेमकं गणित स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत मुंबईत कोणाची सत्ता येणार, टफ फाईटमध्ये बाजी कोण मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालना महापालिका निवडणुकीत विजयी

    follow whatsapp