Jharkhand Government पाडण्याच्या कटात चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात? बावनकुळे म्हणतात…

मुंबई तक

• 11:54 AM • 26 Jul 2021

झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार पाडण्याचं षडयंत्र रचल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या कटामध्ये राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात आहे असा आरोप होतो आहे. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. आपण झारखंडला गेलो नाही त्यामुळे या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. झारखंडचं […]

Mumbai Tak
Google CTA

झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार पाडण्याचं षडयंत्र रचल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या कटामध्ये राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात आहे असा आरोप होतो आहे. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. आपण झारखंडला गेलो नाही त्यामुळे या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

झारखंडचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नांमध्ये माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव पुढे आलं आहे.या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने बावनकुळे यांचं नाव घेतलं असंही सांगितलं जातं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असली तरीही हे आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळून लावले आहेत. मी झारखंडमध्ये कधीही गेलो नाही तिथलं सरकार पाडण्याची आपली लायकी नाही असंही बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. त्याबरोबरच हे आरोप निराधार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

झारखंडच्या एका आमदाराने दावा केला आहे की काही अज्ञात लोकांनी त्याला वारंवार संपर्क केला होता. झारखंड मुक्ती मोर्चा अर्थात झामुमो, काँग्रेस आणि राजद यांचं सरकार पाडण्यासाठी एक कोटी रूपये आणि मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती असं या आमदाराने म्हटलं आहे. तसंच या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांचं समोर आलेलं नाव. चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस सरकारच्या काळात उर्जा मंत्री होते. त्यांचा हे सरकार पाडण्याच्या कटात हात होता असा आरोप झाला आहे. मात्र हे आरोप बावनकुळेंनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

झारखंड सरकार पाडण्याचा कट रचल्या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कटात झारखंडचे तीन आमदार, दोन पत्रकार आणि काही मध्यस्थ होते अशीही माहिती या तिघांनी पोलिसांना दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन जण सरकारी कर्मचारी आहेत. तर एकजण दारूचा व्यवसाय करतो. रांची येथील हॉटेलमधून या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे.