वाढीव वीज बिलप्रश्नी भाजपची राज्यव्यापी आंदोलनाची हाक

लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना अव्वाच्या सव्वा वीज बिले आली होती. ही वाढीव बिलं रद्द करावीत किंवा कमी करावीत यासाठी सर्वसामान्यांकडून मागणी करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेटही घेण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने, महावितरण कंपन्यांकडून ग्राहकांना कोणताही दिलासा दिला गेला नाही. त्यानंतर मनसेने आंदोलन करून वाढीव बिलं मागे घेण्याची मागणी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:16 AM • 02 Feb 2021

follow google news

लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना अव्वाच्या सव्वा वीज बिले आली होती. ही वाढीव बिलं रद्द करावीत किंवा कमी करावीत यासाठी सर्वसामान्यांकडून मागणी करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेटही घेण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने, महावितरण कंपन्यांकडून ग्राहकांना कोणताही दिलासा दिला गेला नाही. त्यानंतर मनसेने आंदोलन करून वाढीव बिलं मागे घेण्याची मागणी केली होती. शिवाय, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन हे अतिरिक्त वीज बिलासंदर्भात दिलासा देण्याची मागणी केली होती.

हे वाचलं का?

त्यापार्श्वभूमीवर वाढीव वीज बिलांविरोधात कोल्हापूरकरांनी वाहन मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला तर भिवंडीतही मनसेकडून टोरेंट पॉवर कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. मात्र अजूनही त्याबाबत तोडगा न निघाल्याने आता भाजपने आंदोलनाची हाक दिली आहे.

    follow whatsapp