Samruddhi Accident : ‘त्या’ बस अपघाताबद्दल मोठी अपडेट! चालकाच्या रक्तात सापडले…

रोहिणी ठोंबरे

• 07:12 AM • 07 Jul 2023

Vidarbha Travels Bus Accident : महाराष्ट्राला हादरा बसवणारी घटना 30 जून 2023 रोजी घडली. ज्यामुळे सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. बुलढाणा बस दुर्घटनेत 25 जण जिवंत जळाले होते. अशा स्थितीत फॉरेन्सिक अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

As many as 26 passengers have died in bus accident on Buldhana Samruddhi highway. See the list of passengers in the bus

As many as 26 passengers have died in bus accident on Buldhana Samruddhi highway. See the list of passengers in the bus

follow google news

Vidarbha Travels Bus Accident : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर 30 जून रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघाताची आता चौकशी सुरू असून, एक महत्त्वाची माहिती तपासातून समोर आली आहे. अपघाताबद्दल फॉरेन्सिक अहवालात बसचालकाविषयी महत्त्वाची बाब नमूद करण्यात आली आहे. (Buldhana Bus Accident Update driver was driving drunk information From Forensic Report)

हे वाचलं का?

अहवालानुसार, अपघाताच्या वेळी बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असं समोर आलं आहे. बसचालकाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्यानंतर हे उघड झाले आहे. त्याच्या रक्तात अल्कोहोल (मद्य)असल्याचे आढळून आले आहे. चालकाच्या रक्ताच्या चाचण्या फॉरेन्सिक सायन्स अर्थात न्यायवैद्यक पथकाकडून करण्यात आल्या.

वाचा : NCP चे अध्यक्ष शरद पवार की, अजित पवार? पक्षाची घटना, नियम काय सांगतात?

फॉरेन्सिक अहवालानुसार, बस चालक दानिशच्या शरीरात 30% अल्कोहोल आढळले. अपघातात बस चालक दानिश आणि कंडक्टर अरविंद मारुती जाधव हे दोघे बचावले. यामुळे बसचा अपघात समृद्धी महामार्गामुळे नाही, तर चालकामुळे झाला असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे.

टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यताही फॉरेन्सिक अहवालात तपासण्यात आली आहे. त्यासाठी टायर्सचे मार्क्स आणि नमुनेही तपासण्यात आले. मात्र, ही शक्यता फेटाळण्यात आली. पोलिसांनी चालक आणि कंडक्टरला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशीही केली जात आहे.

वाचा : अजितदादांकडून NCP जाणार? सिब्बलांचा मोठा दावा; म्हणाले, “घड्याळ आणि धनुष्यबाण…”

बस चालक झोपेत होता

महाराष्ट्रात 100 मिली रक्तामध्ये 0.03 किंवा 30 मिलीग्राम अल्कोहोल असणं ग्राह्य धरलं जातं, परंतु ड्रायव्हरच्या रक्तामध्ये 30% जास्त अल्कोहोल आढळले. पुराव्यानुसार, अपघात झाला तेव्हा चालक झोपेत होता. आता अहवाल समोर आल्यानंतर तो न्यायालयात सादर केला जाऊ शकतो. त्यामुळे बसचालकाच्या अडचणी वाढू शकतात.

महामार्गावर कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर खांब आणि दुभाजकाला धडकल्यानंतर बसला आग लागल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. बुलढाणा जिल्ह्यातून जात असताना बस प्रथम लोखंडी खांबाला धडकली आणि नियंत्रण सुटल्यानंतर दुभाजकाला धडकून उलटली.

वाचा : अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळेंचं वाढलं टेन्शन, ‘हे’ असेल मोठं आव्हान

या अपघातानंतर पोलिसांनी समृद्धी द्रुतगती मार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली. ज्यामध्ये वाहनांच्या चाकांची स्थिती, हवेचा-नायट्रोजनचा दाब आणि आपत्कालीन खिडक्यांची स्थिती विचारात घेण्यात आली. बसमध्ये दोन ड्रायव्हर आणि कंडक्टर आहेत का, वैध कागदपत्रे आणि इतर महत्त्वाच्या गोष्टीही तपासण्यात आल्या.

    follow whatsapp