मुंबईत बसून परदेशातील भारतीयांना ४ कोटींचा गंडा, पोलिसांनी कसं शोधलं?

मुंबई तक

• 10:34 AM • 29 Dec 2022

Cyber Crime: मुंबई: सध्याच्या डिजिटलायझेशनच्या काळात सायबर गुन्हेगारी (Cyber Crime) आणि फसवणुकीच्या घटनांचा आकडा हा वाढताना दिसत आहे. मुंबईतही अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. मुंबईतील कांदिवली (Kandivali) विभागात बनावट विदेशी कॉल सेंटरद्वारे कोट्यवधींची फसवणूक झाल्याची ही घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या कांदिवली गुन्हे शाखा युनिटने बनावट विदेशी कॉल सेंटर (Call center) चालवणाऱ्या २ […]

Mumbaitak
follow google news

Cyber Crime: मुंबई: सध्याच्या डिजिटलायझेशनच्या काळात सायबर गुन्हेगारी (Cyber Crime) आणि फसवणुकीच्या घटनांचा आकडा हा वाढताना दिसत आहे. मुंबईतही अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. मुंबईतील कांदिवली (Kandivali) विभागात बनावट विदेशी कॉल सेंटरद्वारे कोट्यवधींची फसवणूक झाल्याची ही घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या कांदिवली गुन्हे शाखा युनिटने बनावट विदेशी कॉल सेंटर (Call center) चालवणाऱ्या २ डायरेक्टर्ससह ६ जणांना अटक केली आहे. पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे गुन्हेगार केवळ परदेशी नागरिकांनाच आपले लक्ष करत होते.

हे वाचलं का?

अटक करण्यात आलेल्या लोकांकडून पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क, लॅपटॉप आणि सॉफ्टवेअर जप्त करण्यात आले आहेत. कांदिवली गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार, कॉल सेंटरमध्ये २५ मुलींसह सुमारे ६१ लोक काम करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिप्टो करन्सी, कमोडिटी आणि फॉरेक्समध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली या गुन्हेगारांनी जवळजवळ अडीच हजार परदेशी नागरिकांना चार कोटी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती मिळाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इंदर कुमार रविशंकर पासी वय ३० वर्षे, इरफान इकबाल दानवाला (४३), जाहिद झेवियर शेख (४३), श्रीजू वालसन पणिकर (३२), इसाई कुमार (२७), अंकुश संजर शर्मा (२६) यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ३ वेगवेगळे सॉफ्टवेअर, ०६ लॅपटॉप आणि स्मार्टफोन जप्त केले आहेत.

गुन्हे शाखेपर्यंत ‘या’ रॅकेटची माहिती कशाप्रकारे पोहोचली?

गुन्हे शाखा युनिट ११चे वरिष्ठ पीआय विनायक चौहान यांना गोरेगाव प्रेम नगर भागातील डीएलएच पार्क कार्यालय क्रमांक ३०१, तिसरा मजला येथे बनावट कॉल सेंटर चालवले जात असल्याची माहिती मिळाली होती. येथे इंटरनेट कॉल करून विदेशी चलन गुंतवण्यासाठी विदेशी नागरिकांना संपर्क केला जात होता. तिथे परदेशी भाषा वापरून इंटरनेट कॉल करत आणि कमोडिटी, फॉरेक्स ट्रेड आणि इतर पद्धतींद्वारे लोकांना चांगला परतावा देण्याच्या नावाखाली ही फसवणूक केली जात होती.

बनावट कॉलसेंटरमध्ये ५०हून अधिक सहकाऱ्यांचा समावेश!

या बनावट कॉल सेंटरमध्ये २५ मुलींसह ६१ लोक परदेशी भाषा वापरून नागरिकांची फसवणूक करत होते. हे लोक त्यांच्या www.w bandsmith.com या वेबसाइटद्वारे सर्व गुंतवणूकदारांची माहिती आणि पैसे शेअर करायचे ज्यामुळे गुंतवणूकदार सहज विश्वास ठेवत होते.

    follow whatsapp