समीर वानखेडेंना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा दिलासा, अनुसुचित जातीत असल्याचा निर्वाळा

मुंबई तक

• 06:34 AM • 13 Aug 2022

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने क्लीन चिट दिली आहे. समीर वानखेडे हे अनुसुचित जाती प्रवर्गातील असल्याचा निर्वाळा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे बनावाट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता. मात्र समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलासा दिला आहे. […]

Mumbaitak
follow google news

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने क्लीन चिट दिली आहे. समीर वानखेडे हे अनुसुचित जाती प्रवर्गातील असल्याचा निर्वाळा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे बनावाट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता. मात्र समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलासा दिला आहे.

हे वाचलं का?

समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केले होते आरोप

समीर वानखेडे हे एनसीबीचे अधिकारी असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई बोगस असून त्यांनी जाणीवपूर्वक हे कुभांड रचलं असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. एवढंच नाही तर नवाब मलिक यांनी जवळपास रोज पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत तरीही त्यांनी जातीचं खोटं प्रमाणपत्र देऊन सरकारी नोकरी मिळवली असा गंभीर आरोपही त्यांनी केला होता.

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने काय म्हटलं आहे?

समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरील आक्षेपाची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी करताना समितीने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवत वानखेडे यांनी क्लिन चीट दिली. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम नसल्याचे या समितीने म्हटले. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्मामध्ये विधीवत धर्मांतर केले नसल्याचे समितीने म्हटले. समीर वानखेडे यांचे वाडवडील हे हिंदू धर्मीय अनुसूचित जातीतील असल्याचे सिद्ध होत असल्याचेही जातपडताळणी समितीने म्हटले. समीर वानखेडे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याने ही तक्रार फेटाळून लावण्यात येत असल्याचे जात पडताळणी समितीने म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी काय आरोप केला होता?

समीर दाऊद वानखेडे यांचा जन्मदाखला आम्ही ट्विटरवर टाकला होता. त्यावर इथूनच फसवेगिरी सुरू झाल्याचं म्हटलं होतं. मजेची गोष्ट म्हणजे फसवेगिरी सुरू झाली, ती आणखीच बोगस गोष्टीपासून. नाव बदलल्याचं एक प्रतिज्ञापत्र १९९३ मध्ये महापालिकेसमोर सादर करण्यात करण्यात आलं. १९९३चं प्रतिज्ञापत्र दोन व्यक्तींनी दाखल केलं होतं. दाऊद वानखेडे नसून ज्ञानदेव वानखेडे असल्याचं त्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं गेलं. मग जन्मदाखल्यात चिन्हांकित करून बाजूला ज्ञानदेव लिहिलं गेलं.

वीन जन्मदाखला तयार झाला. सेंट पॉल शाळेतील दाखल्यावरही मुस्लीम असल्याचं आणि समीर दाऊद वानखेडे असल्याचं आम्ही समोर आणलं आहे. सेंट जोसेफ शाळेच्या दाखल्यावरही हेच नाव होतं. त्यानंतर सेंट जोसेफच्या टीसीवर नाव बदलण्यात आलं आणि ही फसवेगिरी करण्यात आली असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

    follow whatsapp