स्मृती इराणींच्या मुलीशी संबंधित ट्विट डिलिट करा, काँग्रेस नेते पवन खेडा यांना दिल्ली हायकोर्टाचे निर्देश

दिल्ली हायकोर्टाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणीनी दाखल केलेल्या याचिकेनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेडा यांच्या विरोधात समन्स जारी केला आहे. एवढंच नाही तर पवन खेडा यांना हेदेखील निर्देश दिले आहेत की त्यांनी स्मृती इराणींच्या मुलीविरोधात केलेलं ट्विट २४ तासात डिलिट करावं. पवन खेडा यांनी स्मृती इराणी यांची मुलगी बेकायदा परवान्यावर बार चालवते असा […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:08 AM • 29 Jul 2022

follow google news

दिल्ली हायकोर्टाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणीनी दाखल केलेल्या याचिकेनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेडा यांच्या विरोधात समन्स जारी केला आहे. एवढंच नाही तर पवन खेडा यांना हेदेखील निर्देश दिले आहेत की त्यांनी स्मृती इराणींच्या मुलीविरोधात केलेलं ट्विट २४ तासात डिलिट करावं. पवन खेडा यांनी स्मृती इराणी यांची मुलगी बेकायदा परवान्यावर बार चालवते असा आरोप त्यांच्या ट्विटमध्ये केला आहे. जयराम रमेश यांनीही असाच आरोप केला होता. त्यानंतर कोर्टाने हे निर्देश दिले आहेत.

हे वाचलं का?

Don’t Talk to me असं संसदेत सोनिया गांधी स्मृती इराणींना काय म्हणाल्या? नेमकं काय घडलं?

स्मृती इराणी यांच्यातर्फे याचिकेत काय म्हटलं गेलं आहे?

स्मृती इराणी यांच्यातर्फे कोर्टाला हे सांगण्यात आलं की जो आरोप काँग्रेसचे हे दोन नेते करत आहेत त्या आरोपांशी माझ्या मुलीचं काहीही घेणंदेणं नाही. माझ्या मुलीच्या बदनामीसाठीच हे आरोप करण्यात येत आहेत असंही कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

दिल्ली हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं आहे?

या प्रकरणातले आरोप हे बिनबुडाचे आहेत. दिल्ली हायकोर्टाने पवन खेडा यांना त्यांचं स्मृती इराणींच्या मुलीविषयीचं ट्विट २४ तासात हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ ऑगस्टला होणार आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने जयराम रमेश, पवन खेडा आणि नेट्टा डिसूझा यांना समन्स जारी केले आहेत. पुढील सुनावणीला कोर्टात उपस्थित राहा असंही मह्टलं आहे.

काय आहे स्मृती इराणींच्या झोईश इराणीबाबतचं प्रकरण काय?

काँग्रेसने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीच्या गोवा येथील रेस्तराँ आणि बारबाबत एक गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी हे म्हटलं होतं की स्मृती इराणी ज्या पक्षाशी जोडल्या गेल्या आहेत तो पक्ष संस्कारी आहे मात्र त्याचप्रमाणे त्यांच्या मुलीनेही संस्कारी असलं पाहिजे. मात्र स्मृती इराणींची मुलगी गोव्यात एक रेस्तराँ चालवते जे १३ महिन्यांपूर्वी एका माणसाच्या नावे बनावट लायसन्सवर सुरू करण्यात आलं आहे.

    follow whatsapp