डोंबिवलीत चाललंय काय? इन्स्टाग्रामवरुन ओळख वाढवली, अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक

मुंबई तक

• 10:05 AM • 27 Sep 2021

डोंबिवलीत गेल्या काही दिवसांत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच विष्णूनगर पोलिसांनी एक मोठी दुर्घटना होण्यापासून रोखली आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख वाढवून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीची सुखरुप सुटका केली असून तिला पालकांच्या स्वाधीन केलं आहे. आरोपी अक्षय […]

Mumbai Tak
Google CTA

डोंबिवलीत गेल्या काही दिवसांत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच विष्णूनगर पोलिसांनी एक मोठी दुर्घटना होण्यापासून रोखली आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख वाढवून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी पीडित तरुणीची सुखरुप सुटका केली असून तिला पालकांच्या स्वाधीन केलं आहे. आरोपी अक्षय महाडीकला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Dombivli Gang Rape च्या निमित्ताने! सोशल मीडियामुळे सामाजिक चळवळींची धार बोथट?

आरोपीने आपल्या मुलीला पळवून निल्याचं लक्षात येताच पीडित मुलीच्या पालकांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असताना सुरुवातीचे काही दिवस त्यांना यश मिळालं नाही. यावेळी पोलिसांनी खासगी गुप्तहेरांच्या मदतीने आरोपीचा मागोवा घेत त्याला ठाणे स्थानकातून अटक केली. यावेळी चौकशीदरम्यान आरोपीने मुलीला भिवंडीतील काल्हेर येथील एका इमारतीत चार दिवसापासून डांबून ठेवल्याचं समजलं.

डोंबिवली : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक

यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरुन मुलीची सुटका करत तिला पालकांच्या ताब्यात दिलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अक्षय महाडीकची अल्पवयीन मुलीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. यानंतर त्याने मुलीला फूस लावून पळवून नेलं. अक्षय हा सीसीटीव्ही सिस्टीम, कम्प्युटर आणि सोशल मीडिया या विषयात तरबेज आहे. या माध्यमातूनच त्याने पीडितेशी ओळख वाढवल्याची माहिती पोलिसांनी दिली. परंतू वेळेत कारवाई करत पोलिसांनी पीडितेला आरोपीच्या तावडीतून सोडवलं आहे.