Uddhav Thackeray : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या आणि मतदार याद्यांमधील कथित घोळाविरोधात ठाकरेंचा भव्य मोर्चा मुंबईत होत आहे. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विविध विरोधी पक्षांतील नेते उपस्थित होते. या मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर या नेत्यांनी सभेला संबोधित केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी मेक इन इंडियाचा संदर्भ देत मोदींनी मेक इन इंडिया हुकूमशाह बनू नये, अन्यथा तुमची हुकूमशाही गाडून टाकू असे टीकास्त्र डागले.
ADVERTISEMENT
मेक-इन इंडिया हुकूमशाह
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, 'पहिल्या प्रथम मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी मेक-इन इंडिया अशी घोषणा दिली होती. आम्हाला मान्य आहे. पण मेक इन इंडियात हुकूमशाह आपल्या देशात बनणार असेल तर त्याला या देशातच गाडून टाकण्यासाठी आम्ही आज उभे राहिलो आहोत. बाकी सगळं मेक इन इंडिया ठीक आहे. पण मेक इन इंडियाच्या नावाखाली तुम्ही हुकूमशाह बनणार असाल तर आम्ही तुमची हुकूमशाही गाडून टाकली असं समजा.'
हे ही वाचा : ठाकरेंचा 'गर्जना मोर्चा' सुरू होण्याआधीच सगळ्यात मोठी आणि इंटरेस्टिंग बातमी, महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधीच नाही घडलं!
मतदार मतदान करु शकणार आहेत का?
मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांविषयी बोलताना ते म्हणाले की, संपूर्ण देशात तेरा कोटी मतदार यांनी वगळून टाकले आहेत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या यांनी देशाच्या मतदार यादीतून वगळून टाकली आहे. बंगालमध्ये वगळले, तामिळनाडूत वगळले. विशेष म्हणजे बंगालमध्ये जे मतदार वगळले गेले, त्यातील काही मतदार अर्ज केल्यानंतर वैध झाले. आता तिकडे पोटनिवडणूक आहे. या मतदारांना पोटनिवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी तात्काळ सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टात गेले. निवडणूक आहे सहा तारखेला (ऑक्टोबर) आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं आम्ही पाच तारखेला सुनावणी घेऊ. सुनावणी घेऊन तात्काळ मतदारांच्या बाजूने निकाल दिला गेला तर ते मतदार मतदान करु शकणार आहेत का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा : CJP साठी आला, गुरुद्वारात राहिला, ठाकरेंच्या मोर्चात युपीता छोकरा का?
त्या कमिटीविषयी काय म्हणाले?
ते पुढे म्हणाले की, निवडणूक आयुक्त नेमण्याच्या कमिटीत सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते होते. यांनी यातून सरन्यायाधीश काढून टाकले. विरोधी पक्षनेता ठेवला आणि सरन्यायाधीशांच्या जागी पंतप्रधान म्हणतील तो मंत्री टाकला. म्हणजे कोण? अमित शहा. राहुल गांधींनी ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. पण हे ज्ञानेशला नेमून मोकळे झाले.
ADVERTISEMENT












